मालेगावच्या काँग्रेस, उबाठा आणि एमआयएमच्या आमदार, खासदारांकडून किरीट सोमय्यांना धमकी!

    31-Jan-2025
Total Views |
 
Kirit Somaiyya
 
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावातील जन्म दाखला घोटाळा उघडकीस आणला. परंतू, आता मालेगावच्या काँग्रेस, उबाठा आणि एमआयएमच्या आमदार, खासदारांकडून धमक्या देण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे.
 
किरीट सोमय्या म्हणाले की, "मालेगावचे काँग्रेस, उद्धव ठाकरे सेना, आणि एमआयएमचे आमदार, खासदार मला आता धमक्या देत आहेत. बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या विरोधात आंदोलन केल्यास आम्ही आम्ही किरीट सोमय्यांना जाब देणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे."
 
हे वाचलंत का? -  पुण्यात उबाठा गटाला धक्का! माजी आमदार साथ सोडणार?
 
मालेगावमध्ये ३ हजार ९७७ बांगलादेशी रोहिंग्यानी अर्ज केला असून खोटे कागदपत्र दिले. त्यामुळे त्यांच्या विरोधात पोलिस कारवाई झालीच पाहिजे असे सांगत या सर्वांना बांग्लादेशला परत पाठवणार असल्याचे किरीट सोमय्यांनी स्पष्ट केले.
 
शुक्रवार, ३१ जानेवारी रोजी किरीट सोमय्या मालेगाव पोलिस स्टेशनला भेट देणार आहेत. "महाराष्ट्रात ५४ शहरांत १ हजारहून अधिक बांग्लादेशी रोहिंग्या घुसखोरांनी खोटे कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातल्याने हा घोटाळा उघडकीस आला आहे. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी मालेगावला जाणार आहे," अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी दिली. दरम्यान, त्यांच्या मालेगाव दौऱ्याला मुस्लिम संघटनांकडून विरोध करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.