ममता कुलकर्णींची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी!

लक्ष्मी नारायण त्रिपाठींनाही आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवले

    31-Jan-2025
Total Views |

Mamata Kulkarni Kinnar Akhara

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Kinnar Aakhara Mamata Kulkarni)
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांना किन्नड आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून हटवल्याची मोठी माहिती निदर्शनास येत आहे. त्यांच्यासोबतच लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आले आहे. याबाबत किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी नुकतीच घोषणा करत किन्नर आखाड्याची पुनर्रचना केली जाणार असल्याचेही सांगितले.

हे वाचलंत का? : पुण्यात उबाठा गटाला धक्का! माजी आमदार साथ सोडणार?

ममता कुलकर्णी यांना किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनवल्यापासून नवा वाद सुरु झाला होता. एखाद्या स्त्रीला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर कसे केले जाऊ शकते, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ दरम्यान ममता कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी आपले पिंडदान करून सन्यास घेतला होता. यानंतर भव्य स्वरुपात पट्टाभिषेक करत त्यांना किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर करण्यात आले होते.

श्री यमाई ममता नंद गिरी असे नावही त्यांना देण्यात आले. त्या महाकुंभात ७ दिवस राहिल्या, मात्र तेव्हापासून एका महिलेला किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर का करण्यात आली, असा वाद सुरू होता. आता लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि ममता कुलकर्णी या दोघींचीही किन्नर आखाड्यातून हकालपट्टी केली असून नवीन आचार्य महामंडलेश्वर यांची लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याचे ऋषी अजय दास यांनी सांगितले.