मोठी बातमी! दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी 'आप'ला खिंडार
एकाचवेळी ७ आमदरांचा पक्षाला अखेरचा राम राम
31-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली (Delhi Assembly election) : दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला खिंडार पडले आहे असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. कारण आपच्या सात नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अखेरचा राम राम केला आहे. राजीनाम्यात त्रिलोकपुरीचे आमदार रोहित मेहरौलिया, कस्तुरबा नगरचे आमदार मदनलाल, जनकपुरीचे आमदार राजेश ऋषी आणि पालममधील भावना गौर यांचाही यामध्ये समावेश आहे.
बिजवासनचे आमदार भूपिंदर सिंग जून,आदर्श नगरचे आमदार पवन कुमार शर्मा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्षाने या आमदारांना दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ च्या निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले नसल्याने नेत्यांमध्ये नाराजी नाट्य निर्माण झाले. यामुळे ते पक्षातून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. राजीनामा दिलेल्या सूत्रांच्या सदस्यांनी शुक्रवारी ३१ डिसेंबर २०२५ रोजी माहिती दिली आहे.
7 AAP MLAs resigned from party today. In last one hour everyone submitted resignations one after another.
मेहारोलीचे आमदार नरेश यादव यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. सलग दोन वेळा आमदार राहिलेल्या यादव यांनीही राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. काही आरोप हे खरे ठरल्यानंतर यादव यांनी आपल्या स्वेच्छेने त्यांचे तिकीट परत दिले आणि माघार घेतली आहे. त्यानंतर 'आप'ने महरेली मतदारसंघामध्ये दुसरा उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.