मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर कठोरात कठोर कारवाई करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवार, ३१ जानेवारी रोजी दिली.
आदिती तटकरे म्हणाल्या की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला आहे. याबाबत ४ ऑक्टोबर रोजी पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
हे वाचलंत का? - अमरावतीच्या विकासात्मक बदलासाठी प्रयत्न करणार! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आश्वासन
"सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नाही. याबाबतची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. अर्जदारांच्या छाननीबाबत महिला व बालविकास विभाग अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे," अशी माहिती त्यांनी दिली.