महाकुंभमेळ्याला गालबोट, सलग दुसऱ्यांदा भीषण आग

आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर

    30-Jan-2025
Total Views |

Mahakumbh Mela 2025
 
लखनऊ (Mahakumbh Mela 2025) : उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात २५ ते ३० जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्देवी घटनेनंतर आता महाकुंभामध्ये दुसऱ्यांदा आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवार ३० जानेवारी २०२५ रोजी सेक्टर २२ मध्ये ही घटना घडली आहे. घटनास्थळी अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या असून आग शमवन्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
 
महाकुंभमेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत काही भाविक जखमी झाले होते. त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. त्यावेळी ही घटना घडली आहे. रुग्णवाहिकेच्या इंजिनमधून धूर निघाल्याने आग लागली.
 
 
 
या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही एक जीवितहानी निर्माण झाली नाही. ज्या ठिकाणी आग लागली होती त्या तंबूमध्ये कोणीही नव्हते. त्यामुळे दैवबलवत्तर म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. यामुळे मोठी दुर्घटना होता होता वाचली आहे. मात्र अनेक तंबू जळून खाक झाले आहेत. तंबूंना कपडी छप्पर असून हवेमुळे आग भडकल्याने अनेक तंबूंनी पेट धरला.
 
दरम्यान याआधीही १९ जानेवारी रोजी महाकुंभात आग लागली होती. ही आग सेक्टर १९ मध्ये लागली असल्याचे बोलले गेले होते. तेव्हाही तंबूंनी पेट घेतल्याने तंबूंचे नुकसान झाले होते. यामुळे धुराचे साम्राज्य झाले होते. त्यावेळी अग्निशमन दलाने आगीला नियंत्रणात आणण्यात यश मिळवले. आता पुन्हा महाकुंभात दुसऱ्यांदा आग लागल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे.