अवैधपणे घुसखोरी करणारे २५ ते ३० बांगलादेशी पोलिसांच्या ताब्यात

राजस्थानातील अजमेरच्या दर्गा परिसरात करत होते अवैध वास्तव्य

    30-Jan-2025
Total Views |
 
Bangladeshi
 
जयपूर : राजस्थानातील अजमेरमधील अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवून त्यांना बाहेर काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. एसपी वंदिता राणा यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पथकाने दर्गा परिसरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये बांगलादेशी घुसखोरांची शोधमोहिम सुरु केली आहे. या मोहिमत २५ ते ३० बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे.
 
दर्गा पोलीसांनी या प्रकरणाबाबत सांगितले की, या भागामध्ये अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यासाठी विशेष पथक राबवण्यात आले आहे. यासाठी आता शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून काही सूत्रधारांकडून माहिती गोळा करता येईल. तांत्रिक माध्यमाद्वारे विविध माहितीच्या आधारे कब्रीस्तान, आंदकोट, न्यू रोड आणि इतर परिसरामध्ये सुमारे २५-३० घुसखोरांना ताब्यात घेतले आहे. दर्ग्याच्या संभाव्य भागांना ताब्यात घेत चौकशी करण्यात आली आहे.
 
दर्गा पोलिसांनी सांगितले की, दोन अज्ञातांनी सीमा ओलांडून अवैधपणे भारतात प्रवेश केला. त्यानंतर ते भारतात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत होते. दोघांची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्यांनी ते बांगलादेशी असल्याचे त्यांनी कबुल केले आहे.