नवी दिल्ली : दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरात (एनसीआर) शुक्रवारी धुक्याची दाट चादर ( Fog in Delhi ) पसरली होती. यामुळे दृश्यमानतेवर परिणाम होऊन रेल्वे आणि विमानसेवांवर परिणाम झाला.
शुक्रवारी सकाळी दिल्लीसह संपूर्ण दिल्ली - एनसीआर दाट धुक्याच्या चादरीत लपेटले होते. दाट धुक्यामुळे दृश्यमानता अतिशय कमी झाली होती. यामुळे रहदारीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी ९.३० वाजता दृश्यमानता शून्य होती. धुक्यामुळे उड्डाणे आणि रेल्वेसेवाही प्रभावित झाली आहे.
दिल्लीसह एनसीआरमध्ये गेल्या चार दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे. थंड वारे थंडीच्या लाटेचा प्रभाव दाखवत आहेत. हवामान खात्याने ६ जानेवारीपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे.