मुंबई : वंदे भारत एक्सप्रेसवर ( Vande Bharat Express ) मुंबई ते सोलापूरदरम्यान दगडफेक झाली. गाडीतील सी-११ या डब्याची काच फुटली. यामध्ये कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही, परंतु सर्व प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. गाडी मुंबईहून सोलापूरकडे जाताना जेऊर स्थानकाजवळ ही घटना घडली.
गुरुवारी रात्री मुंबईहून सोलापूरसाठी निघालेली वंदे भारत या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली. सोलापूरकडे जाताना जेऊर रेल्वेस्थानकाजवळ ही घटना घडली आहे. या दगडफेकीमध्ये गाडीच्या सी-११ या डब्याची काच फुटली. या घटनेमध्ये सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. दगडफेकीनंतर प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गाडीवर दगडफेक कोणी केली व त्याचे मुख्य कारण काय यासंदर्भात अधिक तपास स्थानिक पोलिस व रेल्वे अधिकाऱ्यांकडून केला जाणार आहे.