BPSC Protest :बिपीएससी परीक्षा रद्द करण्यासाठी प्रशांत किशोर यांचे आमरण उपोषण!
03-Jan-2025
Total Views |
पटना : बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात, गेली अनेक दिवस विद्यार्थी आंदोलन करीत होते. आयोगाने पुन्हा एकदा परीक्षा घ्यावी यासाठी विद्यार्थींनी आक्रमक पवित्रा स्विकारला होता. विद्यार्थींच्या या लढाईमध्ये लोकप्रिय शिक्षक, युट्युबर खान सर यांनी सुद्धा उडी घेतली. बिहार लोकसेवा आयोगावर ताशेरे ओढतस, शासनाला त्यांनी चांगलेच खडे बोल सुनावले होते. या प्रकरणात मध्यंतरी प्रशांत किशोर यांनी सुद्ध सहभाग नोंदवला होता. अशातच आता २ जानेवारी २०२५ रोजी प्रशांत किशोर यांनी परीक्षा रद्द करण्यासाठी आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.
जनसुराज पार्टीचे संस्थापक, राजकारणाचे अभ्यासक प्रशांत किशोर यांनी बिहार लोकसेवा आयोगाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे. परीक्षेच्या संचालनात होणरी अनियमितता, यावर चिंता व्यक्त करत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. भरती प्रक्रियेतील गैरव्यवस्थापन आणि पारदर्शकतेच्या वाढत्या अभावाच्या वाढत्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी हे पाऊल उचलेले आहे. माध्यमांशी संवाद साधताना प्रशांत किशोर म्हणाले की राज्य सरकारने त्वरीत याकडे लक्ष्य देत, भरतीप्रकीया पारदर्शक करावी यासाठी आमरण उपोषणाचे पाऊल उचलले आहे.