BPSC Protests : विद्यार्थ्यांच्या समर्थनात पप्पू यादव यांचे रेल रोको आंदोलन!

    03-Jan-2025
Total Views |

bpsc
 
पटना : बिहार लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला आता नवीन वळण लागले आहे. एकीकडे जनसुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी आमरण उपोषणाची सुरूवात केल्यानंतर आता राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ३ जानेवारीच्या सकाळी रेल रोको करण्याचा निर्णय घेतला. पीएससीची परीक्षा रद्द व्हावी या मागणीसाठी त्यांनी रेल रोको आंदोलन केलं असल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे.

पूर्णियाचे आमदार पप्पू यादव यांनी बिहारमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत रेल रोको करण्याचा निर्णय घेतला. सचिवालय रेल्वे स्थानकावर, रूळावर ठिय्या आंदोलन करत बिपीएससी विरोधात आंदोलन केले गेले. सकाळी ९ वाजताच्या सुमारास आंदोलकांनी बक्सर फतुहा पॅसेंजर ट्रेन थांबवली गेली. तब्बल २० मिनिटे ही गाडी थांबवण्यात आली होती. समर्थकांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की सरकारने जाणीवपूर्वक आम्हाला हे आंदोलन करण्यास भाग पाडले आहे. ४ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. विद्यार्थ्याी गेली १६ दिवस आंदोलन करीत आहेत, परंतु बिहारच्या राज्य सरकारला त्यांची दखल घ्यावीशी वाटली नाही. आमदार पप्पू यादव माध्यमांशी बोलताना म्हणाले की जो पर्यंत पेपरफुटीची प्रकरणं थांबत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.