नवी दिल्ली : भारताचा शेजरी असलेल्या पाकिस्तानचे 'ना पाक कारनामे जगजाहीर आहेत. त्यांचे छुपे भारतविरोधी धोरण वेळोवेळी उघड झाले आणि प्रसंगी त्यांच्याच अंगाशी आले. भारताने आतंकवादाच्या विरोधात मोहीम सुरू केली असल्यामुळे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रलयाने काळजी व्यक्त केली आहे. त्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार भारत सीमेपलिकडे कारवाई करीत आहे.
वॉशिंग्टन पोस्टने काही दिवसांपूर्वी एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात त्यांनी असा दावा केला आहे की भारतने पाकिस्तानमध्ये शिरून काही लोकांची हत्या करण्याचे आदेश दिले होते, जे भारताच्या राष्ट्रहिताचे आड येत होते. या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की भारताची गुप्तहेर संस्था असलेली RAW २०२१ पासून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा खात्मा करत आहे. यापूर्वी द गार्डीयन या वृत्तसंस्थेनेसुद्धा अशाच पद्धतीचा अहवाल प्रकाशित केला होता, ज्यात म्हटले होते की परदेशात राहणाऱ्या दहशतवाद्यांना भारताने लक्ष्य केले असून, एका व्यापक रणनितीच्या अनुषंगाने पाकिस्तान मधील किमान २० व्यक्तींच्या हत्येचे आदेश देण्यात आले होते.