ब्रेकींग न्यूज! नवी मुंबईततील सानपाड्यात गोळीबार!

03 Jan 2025 13:49:20
Navi Mumbai

मुंबई : नवी मुंबईच्या सानपाडा येथे गोळीबाराचा ( Navi Mumbai Firing ) प्रकार घडला. पाच ते सहा राऊंड फायर करुन आरोपी फरार झाला आहे. या गोळीबारात १ जण जखमी झाला आहे. सानपाडा रेल्वेस्टेशनजवळच्या डी-मार्ट परिसरात हा प्रकार घडला. दोन आरोपींनी बाईकवर येऊन हा गोळीबार केल्याचा प्रकार दिसला आहे.

नवी मुंबईतील सानपाडा येथील डी-मार्ट परिसरात दि. ३ जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन आरोपी बाईकवरुन आले. त्यांनी एका व्यक्तीवर पाच ते सहा राऊंड फायरिंग केले व घटनास्थळावरुन फरार झाले. यातील २ ते ३ गोळ्या संबंधित व्यक्तीला लागल्या आहेत. जखमी व्यक्तीची ओळख पटलेली नसून त्या व्यक्तीला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

सानपाडा पोलिस घटनास्थळी पोहोचले असून फरार आरोपींचा तपास सुरु आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास केला जातोय. भर दिवसात गर्दीच्या ठिकाणी फायरींग झाल्यामुळे नवी मुंबईमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. नवी मुंबई पोलिसांचे आरोपींना शोधण्याचे कार्य सुरु.

Powered By Sangraha 9.0