रेवडी वाटप करणाऱ्या कर्नाटक सरकारच्या तिजोरीत खडखडाट!
महागाईत वाढ, नागरिकांच्या खिशाला कात्री
03-Jan-2025
Total Views |
बेंगळुरू : लोकांना आशादायी स्वप्नांची भुरळ घालत काँग्रेस सरकार २०२३ साली कर्नाटकात सत्तेवर आले. आश्वासनांची पूर्तता करणे दूर, आता तर नागरिकांच्याच खिशाला कात्री बसायची वेळ आल्याचे दिसून येत आहे. नवीन वर्षानिमित्त काँग्रेसच्या सरकारने बस भाडे वाढवण्याचे निर्णय घेतला आहे. राज्यमंत्रिमंडळात घेतलेल्या बैठकीत राज्य शासनाच्या बस भाड्यामध्ये १५ टक्क्यांची वाढ होणार असल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. सदर भाडेवाढ ही ५ जानेवारीपासून राज्यात लागू होणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार धीरज मुनीराज यांनी काँग्रेसवर ताशेरे ओढत म्हटले आहे की सरकार जनतेची राजरोसपणे लूट करीत आहे. याच पार्श्वभूमीवर भाववाढ करणे हे काँग्रेस धोरण आहे की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. जुलै २०२४ मध्ये काँग्रेसने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली होती. दुसऱ्या कर्नाटकाच्या सरकारी रूगणालयात सुद्धा टप्प्या टप्पयाने भाववाढ करण्यात आली.
काँग्रेस सरकार ४८ हजार कोटी रूपये उधार घेणार!
राज्यात एका वर्षाच्या कालावधीत विविध क्षेत्रात झालेली भाववाढ लक्ष्यात घेता, कर्नाटक राज्याचे आर्थीक आरोग्य बिघडले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अशातच आता काँग्रेसचे सरकार आर्थीक घडी नीट करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ४८ हजार कोटी रूपये जानेवारी ते मार्च या महिन्यात उधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार २०२४ - २५ या आर्थीक वर्षात एकूण १ लाख कोटी रूपये उधार घेणार आहे. निवडणुकीत लोकांमध्ये रेवडी वाटपचे काम करणाऱ्या काँग्रेसला राज्याचे आर्थीक धागेदोरे सांभाळता आलेले नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. आम आदमी पक्षाच्याच वाटेवर जात, काँग्रेस सरकारने सुद्धा राज्याचे नुकसान केल्याचे दिसून येत आहे.