"बंगालचा कसाई" अशी ओळख असलेला सुऱ्हावर्दी शालेय पाठ्यपुस्तकात
03-Jan-2025
Total Views |
धाका : मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात बांगलादेशमध्ये कट्टरपंथीयांना मोकळं रान मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. बांगलादेश आता दिवसेंदिवस कट्टरतावादी लोकांच्या स्वाधीन होत आहे. इस्लामीकरणाच्या प्रयत्नास दुजोरा मिळावा यासाठी आता शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये आता याच कट्टरतावाद्यांचा सन्मान केला जाणार आहे. बंगालचा कसाई अशी ओळख असलेल्या हुसेन शहीद सुऱ्हावर्दीसाठी इयत्ता तीसरीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात स्वतंत्र धडा देण्याचा निर्णय बांगलादेशच्या सरकारने घेतला आहे. एकाबाजूला बांगलादेशात हिंदू अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असताना, युनुस सरकार जाणीवपूर्वक सुऱ्हावर्दीसारख्या माणसाचे कौतुक करीत आहेत.
१६ ऑगस्ट १९४६ हा दिवस कोलकात्याच्या इतिहासातील काळा दिवस होता. हिंदू विरोधी सुरू असलेल्या हिंसाचाराचे टोक या दिवशी गाठले गेले. ५ दिवस सुरू असलेल्या या हिंसाचारात एकूण ५००० पेक्षा जास्त हिंदूंची कत्तल करण्यात आली. हजारो हिंदू जखमी झाले, तर लाखो हिंदू बेघर झाले. मुहम्मद अली जिन्नाह आणि त्यांच्या मुस्लीम लीग या पक्षाने पाकिस्तानच्या मागणीसाठी डायरेक्ट अॅक्शन डेची घोषणा केली आणि कत्तलींना सुरूवात करण्यात आली. जिन्नाहांना सहकार्य करत त्यांचे हे ध्येय धोरण अंमलत आण्णयाचे काम केले ते हुसेन शहीद सुऱ्हावर्दी यांनी.१६ ऑगस्ट १९४६ ची सकाळ उगवली ती मुस्लीम लीगच्या नेत्यांनी केलेल्या चिथावणीखोर भाषणांनी, त्यानंतर शक्य होईल तितक्या हिंदूंचा संहार करण्यासाठी लीगचे कार्यकर्ते आणि कट्टरपंथीय सज्ज झाले. हुसेन शहीद सुऱ्हावर्दी नंतरच्या काळात १९४७ पर्यंत बंगाल प्रांताचे पंतप्रधान. फाळणीनंतर १९५७ पर्यंत ते पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.