रिंकू राजगुरूच्या ‘या’ चित्रपटाची ‘थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवात’ झाली निवड

    03-Jan-2025
Total Views |
 
rinku rajuguru
 
 
मुंबई : 'सैराट' चित्रपटातून अवघ्या एका रात्रीत स्टार झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरु लवकरच एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. आत्तापर्यंत तिने ‘कागर’, ‘मेकअप’, ‘झिम्मा २’ या मराठी तर ‘२०० हल्ला हो’ (२०२१), ‘अनकहीं कहाँनिया’ (२०२१), ‘झुंड’ (२०२२), या हिंदी चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. रिंकूने ‘मनसू मल्लिगे’ या सैराटच्या कन्नड भाषेतील रिमेकमध्येही काम केले असून विविध भाषांत काम करून तिने स्वत:च्या अभिनयाची छाप सोडली आहे. दरम्यान, लवकरच आशा वर्कर्सच्या जीवनावर आधारित चित्रपटात ती झळकणार असून या चित्रपटाची निवड ‘थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवात’ झाली आहे.
 
रिंकू राजगुरुच्या नव्या चित्रपटाचे नाव ‘आशा’ असे असून यात रिंकू एका आशा सेविकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. रिंकूने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून याची माहिती दिली आहे. यासह रिंकूने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. रिंकू या पोस्टरमध्ये आशा सेविकेच्या पेहरावात दिसत आहे. रिंकूने पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा सुंदर गोष्ट असू शकत नाही! तुमच्याबरोबर ही उत्कृष्ट बातमी शेअर करताना खूप आनंद होत आहे! आमचा ‘आशा’ चित्रपट प्रतिष्ठित ‘२१ व्या थर्ड आय एशियन’ चित्रपट महोत्सवाच्या ‘स्पर्धा’ विभागासाठी अधिकृतपणे निवडला गेल्याची घोषणा करताना अभिमान वाटतो!”
 

rinku rajuguru 
 
दरम्यान, ‘आशा’ चित्रपटात रिंकु राजगुरूसह शुभांगी भुजबळ, उषा नाईक, सुहास शिरसाठ, दिशा दानाडे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक बाळू पाटील यांनी केले असून दैवता पाटील आणि निलेश कुवर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.