पतीला कशाचीही कल्पना न देताच पत्नीने मुलाचा केला खतना, पोलीस ठाणे गाठत पतीने केली तक्रार
03-Jan-2025
Total Views |
गांधीनगर : गुजरात राज्यातील राजकोटमध्ये प्रेमविवाह केलेल्या कट्टरपंथी पत्नीने आपल्या मुलाचा खतना केला. पतीच्या नकळत तिने आपल्या आई वडिलांच्या मदतीने हे कृत्य केले. मुलाने गुप्तांग दुखत असल्याची तक्रार केली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर घटनेची माहिती मिळताच पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
राजकोटमधील राया टेलिफोननजीकच्या तुलसीपार्क परिसरात ही घटना घडली आहे. हिंदू तरुणाने पोलिसांना सांगितले गेले की, २०१८ मध्ये त्याचे एका कट्टरपंथी तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. यानंतर दोघांनी विवाह केला. या विवाहानंतर त्यांना ४ वर्षांचे अपत्य आहे.
२१ डिसेंबर २०२४ रोजी तो कामानिमित्त बाहेर गेला होता आणि आठवडाभरानंतर पुन्हा परतला. त्यानंतर त्याच्या मुलाने गुप्तांग दाखवत वेदना होत असल्याचे सांगितले. त्याने पाहिले तर मुलाच्या गुप्तांगावर पाने बांधण्यात आली होती. याप्रकरणी त्याने पत्नीला माहिती विचारली असता, तिने आपण आपल्या मुलाचा खतना केल्याची कबुली दिली आहे.
यानंतर हिंदू तरूणाने पोलिस ठाणे गाठत पत्नी रुक्सास आणि सासू या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस याप्रकरणाचा शोध घेत आहेत. याप्रकरणात अद्यापही कोणालाही अटक करण्यात आली नाही. यानंतर पतीच्या सासू सासऱ्याने खतना केल्याचे कबुल केले आहे.
दरम्यान, विवाहानंतर पतीचा धर्म लागू होतो असे हिंदू पतीने तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे पत्नीने केलेले कृत्ये हे परिपूर्ण चुकूचे असल्याचा दावा पतीने केला आहे. तसेच त्याने आपली पत्नी ही नेहमी शिवीगाळ करत होती, असे तक्रारीत दाखल केले.