महिलांच्या नोकरीवर निर्बंध, तालिबानी सरकारचा निर्णय

    03-Jan-2025
Total Views |

Taliban
 
काबुल : अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्यानंतर तेथील महिलांवर अमानुषपणे अन्याय अत्याचार सुरू आहेत. अशातच आता त्या महिलांच्या नोकरीवरही निर्बंध आणले आहेत. अशातच आता तालिबानी सरकारने एक नवा आदेश जारी केला आहे. तालिबानी महिलांना रोजगार देण्याबाबत तत्काळ बंदी आणावी असा आदेश जारी केला आहे.
 
दि ­: ३० डिसेंबर २०२४ रोजी सोशल मीडियावर तालिबानी अर्थमंत्रालयाने पोस्टमध्ये लिहिले आहे की, अफगाणिस्तानात महिलांना काम देणाऱ्या सर्व राष्ट्रीय आणि विदेशी गैर सरकारी संस्था बंद करणार आहेत. स्वयंसेवी संस्थांना ताकीदही देण्यात आली आहे. तालिबानी सरकारने या नियमाची नवीन घोषणा केली आहे. इस्लामी महिला व्यवस्थित हिजाब परिधान करत नसल्याने तालिबानी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
 
 
 
तसेच २९ डिसेंबर २०२४ रोजी तालिबानी सरकारने अशाचप्रकारचा आदेश दिला होता. तालिबानी सरकारने आपल्या घरांना खिडक्या बसवण्यावर विरोध दर्शवला आहे. कारण घराला खिडक्या बसवल्यास परपुरूषाची महिलेवर नजर पडू शकते. विहिर, आंगण अशा ठिकाणी खिडक्या बसवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तालिबानी प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिदने सांगितले की, ज्यांच्या घराला खिडक्या आहेत त्या खिडक्यांवर भिंत बांधा, असे त्यांनी सांगितले.