चुकीला माफी नाही! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमावर पोलिसांचा गोळीबार

    03-Jan-2025
Total Views |

raped minor girl
 
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला १४ तासांत अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी नराधम्याला पकडले असून त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात आरोपीच्या दोन्ही पायांत गोळ्या लागल्या आहेत. याप्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता संबंधित नराधम हा आसामचा रहिवासी असल्याचे समोर आले.
 
इमानविल उर्फ सॅम्युअल असे नराधमाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रसारमाध्यमानुसार, सीओ आशिष यादव यांनी चकमक झालेल्या घटनास्थळाची एकूण माहिती जाणून घेतली. याप्रकरणात त्यांनी सांगितले की, आरोपी मन्सूरपूर येथून फरार होण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, त्याला चकमकीदरम्यान अटक करण्यात आली.
 
ही घटना बेगराज येथील औद्योगिक वसाहतीठिकाणी घडली. मुलीचे आई-वडील हे कामासाठी नजीकच्या कारखान्यात गेले असता त्याचवेळी इमारतीनजीक वास्तव्यास असलेला इमॅन्युएल पीडितेकडे आला. त्याने याआधी पीडितेला फूस लावण्याचा प्रयत्न केला. नंतर तिला चॉकलेट देतो असा बहाणा बनवत एका खोलीत बोलावले. त्यानंतर पीडितेवर अमानुषपणे अत्याचार करत तिची हत्या केली.
 
सायंकाळी मुलीचे आई-वडील कामावरून परतले असता त्यांना आपली मुलगी बेपत्ता झाली असल्याचे समजले. त्यानंतर आपल्या मुलीची शोधमोहिम सुरू केली. पालक तातडीने इमारतीमध्ये गेले असता, आरोपीच्या खोलीला कुलूप दिसून आले. त्यावेळी स्थानिकांनी कुलूप तोडले. त्यानंतर खोलीमध्ये मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात अस्ताव्यस्त पडला होता.
 
पोलिसांकडे याप्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आरोपीच्या शोधमोहिमेसाठी एक पथक तयार करण्यात आले. आरोपीच्या शोधमोहिमेदरम्यान एका जंगलात चकमकीवेळी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.