मी शीशमहलऐवजी मी गोरगरिबांसाठी घरे बांधली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अरविंद केजरीवाल यांना टोला

03 Jan 2025 17:00:09
 
Narendra Modi
 
नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Narendra Modi) यांची खिल्ली उडवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीशमहल या मुद्द्यावरून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मला शीशमहल बांधता आला असता, मात्र मी गोरगरिबांसाठी घरे बांधली असे म्हणत त्यांनी केजरीवाल यांना उपरोधिक टोला लगावत धारेवर धरले आहे. ते दि: ३ जानेवारी रोजी दिल्लीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी केजरीवाल यांना चपराक लगावली आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. ते म्हणाले की, देशाला ठाऊक आहे की, मोदींनी स्वत:साठी कधीही घर बांधले नाही. पण गेल्या १० वर्षांमध्ये ४ कोटींहून अधिक गोरगरिबांसाठी घरे बांधून स्वप्ने पूर्ण केली आहेत. ते पुढे म्हणाले की, मी स्वत:साठी शीशमहल बांधू शकलो असतो, पण देशातील गोरगरीब जनतेला घर देण्याचे माझे उद्दिष्टे होते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० कोटी रूपयांच्या प्रकल्पांचे दिल्ली येथे उद्घाटन केले. अशोक विहार EVS फ्लॅट्स, सरोजिनी नगर सरकारी क्वार्टर, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि दिल्ली विद्यापीठाचे कॅम्पस आणि इतर महाविद्यालये या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0