मालेगाव व्होट जिहाद फंडिंग घोटाळा! दहशतवादी कारवाया आणि कट्टरवादी संघटनांसाठी पैशांचा वापर

ईडीच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड

    03-Jan-2025
Total Views |
 
ED
 
मुंबई : मालेगाव व्होट जिहाद फंडिंग घोटाळा प्रकरणाला आता नवे वळण आले असून हा पैसा दहशतवादी कारवाया आणि कट्टरवादी संघटनांना देण्यासाठी वापरला गेल्याचा संशय ईडीकडून व्यक्त करण्यात आला आहे. ऑपरेशन 'रिअल कुबेर' अंतर्गत तपास करत असताना २२५ प्राथमिक बँक खाती दहशतवादी निधीशी संबंधित असल्याचा ईडीला संशय आहे.
 
 
 
हिंदु युवकांची फसवणूक करून त्यांच्या नावाने ही बँक खाती उघडण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या खात्यांमध्ये आधी मोठी रक्कम जमा करून नंतर हवालाद्वारे त्याचा व्यवहार करण्यात आला. मात्र, या खात्यांमधून केवळ आर्थिक व्यवहार करण्यात आला नसून त्या पैशांचा वापर दहशतवादी कारवाया आणि राजकीय हेतूंसाठी होत असल्याचाही ईडीला संशय आहे.
 
 हे वाचलंत का? - महाराष्ट्राची ही घौडदौड कायम राहील! अवघ्या ६ महिन्यात ९५ टक्के थेट परकीय गुंतवणूक
 
या खात्यांमधून देशभरातून सुमारे ३७९ कोटी रुपये काढण्यात आले आणि याचा वापर विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत करण्यात आला. तसेच सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी या पैशाचा वापर करण्यात आल्याचा संशयही ईडीला आहे. काही कट्टरपंथी संघटनांना रोख रक्कम पुरवली जात असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. हिंदू-मुस्लिम समुदायांमधील मतभेद वाढवणे आणि समाजात अशांतता निर्माण करण्यासाठी या पैशाचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
 
मालेगाव येथील १९ बँक खात्यांमध्ये सुमारे ११४ कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले असून यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले आहे. आरोपी सिराज मेमन याने मेहमूद भागडच्या सांगण्यावरून उघडली असल्याचे त्याने चौकशीदरम्यान कबुल केले. मेहमूद भागड याला चॅलेंजर किंग किंवा एमडी या नावानेही ओळखले जाते. महमूद भागड सध्या फरार असून ईडीकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.