जामा मशीदप्रकरणात गोळीबार करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

03 Jan 2025 18:24:15

Jama Masjid
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील संभलमधील शाही जामा मशिदीच्या (Jama Masjid) सर्वेक्षणादरम्यान २४ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या हिंसाचारात कट्टरपंथी आरोपी टिल्लनला दिल्लीतून अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. टिल्लनने एसपी केके बिश्नोई यांच्यावर एका घराच्या छतावरून गोळीबार केला होता. एसपी बचावले असले तरीही बिश्नोई बचावले गेले असले तरीही त्यांचे पीआरओ या गोळीबारामध्ये जखमी झाले.
 
एसपी केके बिश्नोई हे हिंदूपुरखेडा भागातील आहेत. तर आरोपी टिल्लन हा दिल्लीतील लक्ष्मीनगर भागातील होता अशी माहिती तपासातून समोर आली आहे. नखासा पोलीस ठाणे हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावेळी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा हा घटनास्थळी उपस्थित होता. आग्राच्या एफएसएल पथकाने लेझर लाईटद्वारे हिंदुपूरखेजा भागात गोळीबार झालेल्या घराची ओळख पटवली. यापूर्वी अदनान आणि रिहार नावाच्या आरोपींचे बाटला हाऊस प्रकरणाशी कनेक्शन होते. त्यांना बाटला हाऊस प्रकरणातच अटक करण्यात आली होती.
 
दरम्यान, शाही जामा मशिदीसमोर करण्यात आलेल्या सर्वेक्षणावेळी उपस्थित असलेले एसपी बिश्नोई यांनी माध्यमाशी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी याप्रकरणाचा तपास करत गोळीबार करणारा व्यक्ती कट्टरपंथी टिल्लन असल्याचे सांगितले आहे.
 
Powered By Sangraha 9.0