सच्चे लोग

    03-Jan-2025
Total Views |

Pune

पुणे शहराच्या विकासप्रश्नांवर आज महापालिकेत उच्चस्तरीय बैठक होऊ घातली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महानगरातील विकासकामांना गती कशी देता येईल, त्यादृष्टीने अनेक निर्णय घेतले आणि प्रशासनासोबत बैठका घेत, त्या कामांना गती देण्यासाठीदेखील पुढाकार घेतला. यामुळे ‘मेट्रो’ प्रकल्पाचे पुढील काम, रेल्वे कामांना गती आणि विशेषतः विमानतळ टर्मिनल आणि विमानांच्या सेवांमध्ये वाढ अशी कामे झाल्याचे अलीकडील काळात बघायला मिळाले. डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात येथून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु झाली आहेत. शिवाय, या विमानतळाचे ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे’ असे नामकरणदेखील झाले आहे. पुणे जिल्ह्यातील ‘राष्ट्रीय महामार्ग 60’च्या विकासकामांसाठी मोदी सरकारकडून 2 हजार, 349.32 कोटींचा निधी मंजूर झाला. दिल्लीत होणार्‍या ‘अ.भा.साहित्य संमेलना’साठी पुणे-दिल्ली-पुणे अशी विशेष रेल्वे चालविली जाणार आहे. पुणे आकाशवाणी प्रसारण पुणे केंद्रावरून करणे, वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणे आदी विषयदेखील मार्गी लागणार आहेत.
 
पुणे शहराच्या विकासप्रश्नांवर आज महापालिकेत उच्चस्तरीय बैठक होऊ घातली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतर महानगरात विशेषतः पुणे आणि परिसराच्या विकास कामांना गती देण्याच्या दृष्टीने पावले टाकली गेल्याचे बघायला मिळाले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महानगरातील विकासकामांना गती कशी देता येईल, त्यादृष्टीने अनेक निर्णय घेतले आणि प्रशासनासोबत बैठका घेत, त्या कामांना गती देण्यासाठीदेखील पुढाकार घेतला. यामुळे ‘मेट्रो’ प्रकल्पाचे पुढील काम, रेल्वे कामांना गती आणि विशेषतः विमानतळ टर्मिनल आणि विमानांच्या सेवांमध्ये वाढ अशी कामे झाल्याचे अलीकडील काळात बघायला मिळाले. डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात येथून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु झाली आहेत. शिवाय, या विमानतळाचे ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे’ असे नामकरणदेखील झाले आहे. पुणे जिल्ह्यातील ‘राष्ट्रीय महामार्ग 60’च्या विकासकामांसाठी मोदी सरकारकडून 2 हजार, 349.32 कोटींचा निधी मंजूर झाला. दिल्लीत होणार्‍या ‘अ.भा.साहित्य संमेलना’साठी पुणे-दिल्ली-पुणे अशी विशेष रेल्वे चालविली जाणार आहे. पुणे आकाशवाणी प्रसारण पुणे केंद्रावरून करणे, वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणे आदी विषयदेखील मार्गी लागणार आहेत. शिवाय शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो या नव्या वर्षात सुरु होण्यासाठी पावले टाकली जात आहेत. स्वारगेट-कात्रज मेट्रो विस्तारदेखील होणार आहे. पुण्यातील भाजप आमदार सुनिल कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, माधुरी मिसाळ तसेच, चंद्रकांतदादा पाटील यांनी निवडून आल्यानंतर लगेचच आपापल्या मतदारसंघात विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केल्याचेदेखील बघायला मिळाले. त्यामुळे महानगरात येणार्‍या काळात अनेक ठिकाणी विकासात्मक बदल झाल्याचे बघायला मिळतील, यात शंका नाही. शिवाय आचारसंहितेमुळे जी कामे रखडली होती, तीदेखील महापालिका प्रशासन आणि अन्य शासकीय व्यवस्थेकडून सुरु झाल्याचे पाहायला मिळते. लोकांनी निवडून दिलेले सच्चे लोक सत्तेत आहेत, त्यामुळे हे शक्य आहे.
 
 
अच्छे दिन
हानगरात महापालिकेच्यावतीने जी कामे केली जात आहे, त्याचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यात करावयाच्या कामांचे नियोजन करण्यासाठी आज उच्चस्तरीय बैठक होत आहे. यात खुद्द केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि ज्यांच्याकडे नुकताच नगरविकास खात्याचा कारभार आला, त्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळदेखील उपस्थित राहणार असल्याने या बैठकीतून आणखी शहराच्या विकासाची पायाभरणी होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. या बैठकीत ‘समान पाणीपुरवठा योजना’, ‘नदीकाठ सुधार प्रकल्प’, मिसिंग लिंक, रस्त्यांची कामे, सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पूल कचरा प्रकल्प, विमानतळ धावपट्टी वाढविण्यासाठी भूसंपादन आदींचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. शिवाय महापालिकेकडून महानगरात विविध भागात कामे सुरू आहेत. महानगरातील 15 आदर्श रस्त्यांची कामे गटारांची दुरूस्ती, साधू वासवानी रेल्वे पूल, विश्रांतवाडी उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि सन सिटी ते कर्वेनगर पूल अशा कामांनादेखील गती देण्याबाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. पुणे महानगराला राज्यमंत्र्यांच्या रूपाने आता नगरविकासमंत्री मिळाल्यामुळे या विकासकामांना गती मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे, पुण्यासाठी शहरातून एक केंद्रीय मंत्री, एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री मिळाले असून, त्यांच्याकडील खात्याचा कारभार पाहता ते आपल्या मतदारसंघातील विकासकामांना नक्कीच न्याय देतील, यात शंका वाटत नाही.
 
शिवाय जिल्ह्यातूनदेखील दोन मंत्री मिळाले असल्याने एकूणच पुणे जिल्ह्यात आगामी काळात विकासाचा रथ पुढे जाईल आणि हे महानगर सर्वच दृष्टीने एक लौकिकप्राप्त भविष्यात उदयास येईल, यात संदेह बाळगण्याचे कारण नाही. तसाही या शहराला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा असतानाच शिक्षणाच्याबाबतील अनेक मैलाचे दगड गाठण्यात यश आले आहे. आगामी काळ हा आधुनिकतेचा आहे आणि कौशल्याला वाव दिला जात असल्याने भविष्यात प्रगतीला तारक ठरेल, असेच वातावरण तूर्त निर्माण झाले आहे. तथापि, जी प्रदूषण आणि वाहतूक व्यवस्थेची आव्हाने आहेत, ती मोडीत काढली तर ‘अच्छे दिन’ दूर नाहीत.
 
अतुल तांदळीकर