आरंभ हेरिटेज तर्फे नालासोपाऱ्यात ‘वारसा सहलीचे’ आयोजन

    03-Jan-2025
Total Views |

image
 
नालासोपारा : आरंभ हेरिटेज तर्फे ‘प्राचीन सोपारा हेरीटेज वॉक’ या नालासोपारातील प्राचीन वास्तूंचे महत्व उलगडून सांगणाऱ्या वारसा सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी १२ जानेवारी रोजी सकाळी ९:३० ते दुपारी १२:३० या वेळेत ही वारसा सहल होणार आहे. नालासोपारा येथील मौर्यकालीन स्तूप आणि चक्रेश्वर मंदिर परिसर जाणून घेण्याची संधी या वारसासहलीत मिळणार आहे. या वारसाहलीत सहभागी होण्यासाठी सहभाग शुल्क ४५० रुपये आहे. अधिक माहितीसाठी किंवा सहभागी होण्यासाठी नविन म्हात्रे (९७०२७०२५४६) यांच्याशी संपर्क साधावा.