मुंबई : भारतीय इतिहास संकल समिती, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित डॉ. आनंदी जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ‘गट अ’ (पाचवी ते सातवी), ‘गट ब’ (आठवी ते दहावी), ‘गट क’ (अकरावी ते पदवीधर), ‘गट ड’ (वैद्यक क्षेत्रातील संबंधित विद्यार्थी गट) आणि ‘गट इ’ (खुला गट) अशा पाच गटांमध्ये होणार आहे. निबंध पाठविण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे.
‘गट अ’ साठी स्पर्धेचे विषय ‘डॉ. आनंदी गोपाळ यांचे आयुष्य आणि कार्य- एक प्रेरणा’, ‘डॉ. आनंदी गोपाळ यांच्या जीवनातून शिकलेल्या महत्वाच्या गोष्टी’ आणि ‘महिलांचे स्वावलंबन आणि डॉ. आनंदी गोपाळ यांचा आदर’ ‘गट ब’ साठी स्पर्धेचे विषय ‘डॉ. आनंदी गोपाळ यांचे जीवन : सामर्थ्य, संघर्ष आणि स्त्री अधिकार’, ‘डॉ. आनंदी गोपाळ आणि भारतीय समाजातील स्त्रियांची स्थिती : एक ऐतिहासिक दृष्टिकोण’, ‘डॉ. आनंदी गोपाळ : स्त्री आणि समाजासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व’ ‘गट क’ साठी स्पर्धेचे विषय ‘महिला शिक्षण आणि समतेसाठी डॉ. आनंदी गोपाळ यांचा ऐतिहासिक संघर्ष’, ‘डॉ. आनंदी गोपाळ यांचे जीवन आणि त्यांचे आदर्श : समकालीन समाजावर होणारा प्रभाव’ आणि ‘डॉ. आनंदी गोपाळ : भारतीय स्त्रीवादी चळवळीतील योगदान’ ‘गट ड’ साठी स्पर्धेचे विषय ‘वैद्यकीय क्षेत्रातील महिला डॉक्टरांचा सहभाग’, ‘मानसिक आरोग्य सेवा: आधुनिक आव्हाने आणि उपाय’ आणि ‘वृद्ध रुग्णांसाठी आरोग्य सेवा : वृद्ध लोकांच्या आवश्यकतांचे समाधान’ आणि ‘गट इ’ खुला गट ‘आहार आणि आरोग्य : आधुनिक जीवनशैलीमधील बदल आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम’ ‘मानसिक आरोग्य सेवा : स्त्रियांसाठी विशेष काळजी’ आणि ‘मुलींचे आणि महिलांचे आरोग्य : डॉ. आनंदी गोपाळ यांचे योगदान’ असे विषय आहेत.
प्रत्येक गटातील तीन विजयी स्पर्धकांना अनुक्रमे ३००१ रुपये, २५०१ रुपये आणि १५०१ रुपये अशी पारितोषिके आहेत. अधिक माहितीसाठी आणि स्पर्धेत सहभागी होण्यासाठी डॉ. वंदना केंजळे (९५५२५२४६३२) आणि डॉ. अभिनव कुरकुटे (९७६३७१४०५७) यांच्याशी संपर्क साधावा.