"देवेंद्रजी सावित्रीबाईंचेच काम पुढे नेत आहेत!", छगन भुजबळांकडून तोंडभरुन कौतुक

    03-Jan-2025
Total Views |
 
Bhujbal
 
सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सावित्रीबाई फुलेंचेच काम पुढे नेत आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांचे तोंडभरून कौतूक केले. शुक्रवार, ३ जानेवारी रोजी सातारा येथे आयोजित सावित्रीमाई फुले जयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
 
छगन भुजबळ म्हणाले की, "६ वर्षात सावित्रीबाईंच्या जयंतीला २०० वर्षे पूर्ण होतील. आजही आम्हाला मुलींना शिकवायचे जीवावर येते. पण मुलींना शिकवा. डॉक्टर, इंजिनिअर करा, त्यांचा खर्च सरकार करेल, असे अनेक निर्णय आपण घेतले. देवेंद्रजी सावित्रीबाईंचेच काम पुढे नेत आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या वतीने त्यांना धन्यवाद," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  मालेगाव व्होट जिहाद फंडिंग घोटाळा! दहशतवादी कारवाया आणि कट्टरवादी संघटनांसाठी पैशांचा वापर
 
ते पुढे म्हणाले की, "या सरकारने खूप काम केलीत. मी विरोधी पक्षात होतो त्यावेळी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंची प्रतिमा नव्हती. त्याच विधानसभेच्या सभेत आम्ही ते करणार असे शिंदे आणि फडणवीस साहेबांनी उठून सांगितले. अनेक वर्षांचे आमचे स्वप्न काही महिन्यात त्यांनी पूर्ण केले. एवढेच नाही तर तरुणांच्या सबलीकरणासाठी महाज्योतीसाठी ४५३ कोटी रुपयांची भरीव तरतूद केली. केंद्र सरकारने ओबीसी आयोगाला आयोगाचा दर्जा दिला. संविधानाचा दर्जा दिला. भिडे वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाचे त्यांच्यामुळेच सुरु झाले," असेही ते म्हणाले.