चंदन गुप्ता हत्या प्रकरणी ब्रेकींग अपडेट; २८ आरोपींना अखेर जन्मठेप!

    03-Jan-2025
Total Views |

Chandan Gupta Tiranga Rally

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Chandan Gupta Tiranga Rally)
उत्तर प्रदेशच्या कासगंजमध्ये दि. २६ जानेवारी २०१८ रोजी दरम्यान तिरंगा यात्रा निघाली होती. त्यावेळी चंदन गुप्ता या हिंदू युवकाची हत्या करण्यात आली होती. लखनौच्या एनआयए कोर्टाने या प्रकरणी २८ आरोपींना दोषी ठरवण्यात आले असून सर्वांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शुक्रवार, दि. ०३ जानेवारी रोजी या प्रकरणी सुनावणी झाली. मुख्य आरोपी म्हणून सलीम, वसीम आणि नसीम यांना दोषी ठरवण्यात आले होते.

हे वाचलंत का? : शौर्य आणि धर्म एकाच नाण्याच्या दोन बाजू – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे

कासगंजमध्ये निघालेल्या तिरंगा यात्रेदरम्यान मोठा हिंसाचार उसळला होता. विश्व हिंदू परिषद आणि हिंदू युवा वाहिनीचे कार्यकर्त्यांनी तिरंगा घेऊन मोटारसायकलवरून पदयात्रा काढली होती. ज्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता चंदन गुप्ता हे देखील सहभागी होते. ही यात्रा जेव्हा मुस्लिम बहुल भागातून जाऊ लागली तेव्हा कट्टरपंथी मानसिकता असलेले इस्लामिक जिहादी संतप्त झाले. त्यांनी प्रथम तिरंगा यात्रेला विरोध केला. त्यावरून दोन गटांत वादावादी झाली. वादाचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले. सुमारे अर्धा तास तिरंगा यात्रेवर कट्टरवाद्यांनी दगडफेक केली. यानंतर दंगलखोरांनी चंदन गुप्ता यांच्यावर गोळ्या झाडल्या. चंदनला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.

या घटनेनंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि नंतर हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आले. एनआयएला तपासात असे आढळून आले की ही हत्या एका कटाचा भाग म्हणून करण्यात आली होती, ज्यामध्ये अनेक आरोपी सामील होते. या प्रकरणात एकूण २८ आरोपींना अटक करण्यात आली होती, त्यापैकी अनेकांवर हत्या, दंगल आणि जातीय उन्माद पसरवण्याचे आरोप होते. लखनऊच्या एनआयए कोर्टाने सुनावणीनंतर २८ आरोपींना दोषी ठरवलं आहे. सर्वांना आयपीसीच्या कलम 147, 148, 307/149, 302/149, 341, 336, 504, 506 अंतर्गत दोषी ठरविले आहे.