चंदन गुप्तावर गोळीबार करणाऱ्या २८ कट्टरपंथी देशद्रोहींना जन्मठेप

03 Jan 2025 17:39:37

Chandan Gupta Firing
 
लखनऊ : उत्तर प्रदेश लखनऊच्या एनआयए न्यायालयाने चंदन गुप्ता हत्याकांडातील दोषींना शिक्षा सुनावणी आहे. एनआयएन न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याआधीही संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशातच आता उत्तर प्रदेशातील कासगंज येथे २६ जानेवारी २०१८ रोजी चंदन गुप्ता यांची हत्या करण्यात आली होती. तब्बल ७ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
प्रसारमाध्यमानुसार, लखनऊ एनआयए न्यायालयाने शुक्रवारी ३ जानेवारी २०२५ रोजी हा निर्णय घेतला. याप्रकरणात दोषी आढळलेल्या २८ जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याआधी गुरूवारी त्याला दोषी ठरण्यात आले असून इतर दोघांना निर्दोष म्हणून त्यांची सुटका करण्यात आली.
 
यावेळी एनआयए न्यायालयाने आसिफ कुरेशी, उर्फ हिटलर, अस्लम, असीम, शबाब, साकिब, मुनाजीर रफी, आमिर रफी, सलीम, वसीम, नसीम, बबलू, अक्रम, तौफिक, मोहसीन यांच्यासह काहींना अटक करण्यात आली आहे. तर जाहिद, शाकीर, इम्रान, खालिद परवेझ, वसीफ, इम्रान, शमशाद, जफर,जफर आणि शाकीर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
 
 २६ जानेवारी २०१८ रोजी प्रजासत्ताक दिनी चंदन गुप्ता इतर तरुणांसोबत कासगंजमध्ये बाईक रॅलीत होता. या बाईक रॅलीत प्रत्येकाने आपल्या वाहनाला राष्ट्रध्वज लावला होता. त्यावेळी काही कट्टरपंथी जमावाने त्या बाईक रॅलीवर दगडफेक करत राष्ट्रद्रोह नव्याने दाखवून दिला आहे. त्यावेळी त्यांनी रॅलीवर गोळीबार केला. या गोळीबारात चंदन गुप्ताचा मृत्यू झाला. यानंतर कासगंज येथे प्रचंड हिंसाचार निर्माण झाला. याप्रकरणात वसीम आणि नसीमसह अनेक आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चंदन गुप्ता यांच्या कुटुंबाने कायदेशीर लढाई लढल्यानंतर चंदनला न्याय मिळाला आहे.
 
Powered By Sangraha 9.0