आप सरकार सर्वात मोठा हिंदूविरोधी पक्ष, भाजप प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांचा दावा
03-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : भाजपचे (BJP) राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी शुक्रवारी आरोप केला की आम आदमी पार्टीने २०१६ ते २०२३ सालादरम्यान दिल्लीतील २४ मंदिरे पाडण्याचे आदेश दिले. पूनावाला यांनी कागदपत्रांचा हवाला देत सांगितले की, २०१६ ते २०२३ या काळात आप नेत्यांनी देशाची राजधानी दिल्लीतील २४ मंदिरे पाडण्याचे आदेश दिले आहेत.
याप्रकरणी माध्यमाशी बोलत असताना पूनावाला म्हणाले की, माध्यमाद्वारे आलेली कागदपत्रे दर्शवण्यात आले की, या देशामध्ये आम आदमी पार्टीहून अधिक फसवा पक्ष दुसरा कोणताच नाही. जे इतरांवर आरोप करतात. त्यांचे स्वत:चे अस्तित्व काय आहे? असा सवाल उपस्थित झाला. २०१६-२०२३ सालापर्यंत आपचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी जवळपास २४ हिंदूंची प्रार्थनास्थळे पाडण्याचा फतवा कसा काढला या प्रकरणाची माहिती स्वाक्षरी असलेल्या कागदपत्रांतून मिळाली आहे.
पूनावाला यांनी बोलत असताना आरोप केला की, २०१६ मध्ये तत्कालीन गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी ऐतिहासिक महत्त्व नसलेल्या दोन मशिदी वाचवण्यासाठी हस्तक्षेप करत आठ मंदिरे पाडण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. परंतु मंदिरांबाबत कधीही ते बोलले नाहीत, असे म्हणत पूनावाला यांनी आपल्या विरोधकांवर टीकेची तोफ डागली.
पूनावाला यांनी पुढे आम आदमी पार्टी हा भारतातील सर्वात मोठा हिंदूविरोधी पक्ष असल्याचा आरोप केला आणि डीएमके, टीएमसी आणि काँग्रेस या मित्रपक्षांनी सनातन धर्मावरील झालेल्या हल्ल्यावर मौन बाळगले अशी टीका केली आहे.