स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर
सर्वोच्च न्यायालयात २५ फेब्रुवारी रोजी होणार सुनावणी
29-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक ( Local Body Election ) प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. न्यायालयाने मंगळवारी तसे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या असून हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याप्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाने आता याप्रकरणी पुढील महिन्यात २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयात २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीमध्ये राज्य सरकार आणि याचिकाकर्त्यांनी आपले म्हणणे साधारणपणे तासाभरात मांडणार असल्याचे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयात त्या दिवशी या प्रकरणी प्राधान्याने सुनावणी होऊ शकते. त्यामुळे २५ रोजीच्या सुनावणीनंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.