मृत्यूचे रहस्य (भाग 25)

    29-Jan-2025
Total Views |

Death
 
हंस म्हणजे प्राण! प्राणशक्तीवर विजय मिळविणे म्हणजे हंसजय होय. हंसजयाची सिद्धी प्राप्त झाल्यावर, साधक कितीही काळ श्वासोच्छ्वासाशिवाय राहू शकतो. असेही साधक आहेत की, जे श्वासोच्छ्वासाशिवाय आपल्या रक्तवाहिन्या व हृदयस्पंदन व्यवस्थितपणे चालवू शकतात. शवासन साधनेकरिता हंसजय आवश्यक आहे. दीर्घप्राणायामाद्वारे केवल कुंभक लागून, हंसजय होऊ शकतो. केवल कुंभक व हंसजय यांमध्ये थोडा फरक आहे. केवल कुंभकाद्वारे साधक समाधी अवस्थेत जाऊ शकतो. परंतु, हंसजयाद्वारे साधक समाधी अवस्थेत जाईलच, असे नाही. केवल कुंभक ही केवल अवस्था आहे. ती प्रकृतीची मूल अवस्था आहे, तर हंसजय कठीण योगसाधनांद्वारे प्राप्त होणारी एक प्रकारची सिद्धी आहे.
हंसजय व केवल अवस्था
हंस म्हणजे प्राण! प्राणशक्तीवर विजय मिळविणे म्हणजे हंसजय होय. हंसजयाची सिद्धी प्राप्त झाल्यावर, साधक कितीही काळ श्वासोच्छ्वासाशिवाय राहू शकतो. असेही साधक आहेत की, जे श्वासोच्छ्वासाशिवाय आपल्या रक्तवाहिन्या व हृदयस्पंदन व्यवस्थितपणे चालवू शकतात. शवासन साधनेकरिता हंसजय आवश्यक आहे. दीर्घप्राणायामाद्वारे केवल कुंभक लागून, हंसजय होऊ शकतो. केवल कुंभक व हंसजय यांमध्ये थोडा फरक आहे. केवल कुंभकाद्वारे साधक समाधी अवस्थेत जाऊ शकतो. परंतु, हंसजयाद्वारे साधक समाधी अवस्थेत जाईलच, असे नाही. केवल कुंभक ही केवल अवस्था आहे. ती प्रकृतीची मूल अवस्था आहे, तर हंसजय कठीण योगसाधनांद्वारे प्राप्त होणारी एक प्रकारची सिद्धी आहे. केवल अवस्था शरीराच्या परावस्थेत आहे, तर हंसजयाची सिद्धी शरीराला धरून आहे. सतत चिंतनामुळेही केवलावस्था प्राप्त होऊ शकते, तर हंसजयावस्था सतत अभ्यासाचे फल आहे.
 
पूरक-कुंभक-रेचक यांचे परस्पर प्रमाण 1:36:2 असे सहज झाल्यावर केवल कुंभक साधतो. केवल कुंभक साधला की, केवलावस्था आपोआप केव्हाही येऊ शकते. केवल म्हणजे शून्य अवस्था! केवलावस्था ज्ञानमार्गाचे परिफल आहे. कोणत्याही विषयाशी एकरुप होऊन, त्याही पलीकडील शून्य अवस्थेत गेले की केवल अवस्था येत असते.
शरीरोद्गमन व दूरयात्रा
आपल्या जडशरीरातून आपल्या उर्वरित तीन देहासह व मन, बुद्धी, पंचज्ञानेंद्रिय यांसह उद्गमन करणे, म्हणजेच बाहेर निघण्याच्या सिद्धीला शवासन म्हणतात. ही सिद्धी प्राप्त झाल्यावर, सिद्ध पुरुष इच्छामात्रेकरून पृथ्वीवरील कोणत्याही स्थानी जाऊन तेथील अनुभव घेऊ शकतात. लिंगशरीर कालमात्रेत असल्यामुळे, इतरांना ते सूक्ष्म शरीर दिसणार नाही. प्रेतपिशाच्च म्हणूनच इतरांना अदृश्यमान असतात. ज्यांची दृष्टी त्या स्तरापर्यंत सूक्ष्म झाली आहे वा त्या पिशाच्चांनी करवून घेतली आहे, त्यांनाच ते दिसू शकतील, किंवा आपले शरीर दृश्यमान करू शकतील. हे ते कसे करतात, हा एक जटिल विषय आहे. काही श्रेष्ठ योगी आपले लिंगशरीर एक नव्हे, तर अनेक स्थानावर दृश्यमान करून, आपल्या भक्तांना योग्य मार्गदर्शन करू शकतात. पातंजल योगसूत्रांमधील कैवल्यपादात चौथ्या सूत्रात, योगी अनेक स्थानांवर आपल्या एका शरीरापासून अनेक शरीरे तयार करून जाऊ शकतो, असे वर्णन आहे. लिंगशरीराची धारणा झाल्यावर त्याभोवती पृथ्वीतत्त्वाचे घनीभवन करून, जडशरीरही निर्माण होऊ शकते. पातंजल योगसूत्रात त्याचे वर्णन ‘निर्माणचित्तान्यास्मितामात्रात्’ असे आहे . या प्रक्रियेत योगी, प्रथम अनेक चित्त निर्माण करतो. त्यासभोवताल क्रमाक्रमाने चारी देह उत्पन्न होऊन, जडशरीर दृश्यमान होऊ शकते. चित्त उत्पन्न झाल्यावर, त्याभोवताल स्पंदन करणारा देह सभोवताली असलेल्या महाभूतातील धातूंद्वारा आकर्षित करून, काया उत्पन्न होऊ शकते. यालाच योगसूत्रात निर्माणकाया असे म्हटले आहे.
याचे थोडेसे सूत्रमय वर्णन, ब्रह्मयामलातील शिवकवचस्तोत्रात आले आहे. तेथे असे वर्णन आहे.
यो भूत्स्वरुपेण बिभर्ति विश्वं पायात्स-भूमेर्गिरिशोऽष्टमूर्तिः।
 
योऽपांस्वरुपेण नृणां करोति संजीवनं सोऽवतु मां जलेभ्यः॥9॥जीवसृष्टीचे दृश्यमान जडस्वरुप भूमी म्हणजे पृथ्वीतत्त्वात असून, त्या पृथ्वीतत्त्वाला झाकणारे त्यामागील तत्त्व आप आहे. त्या आपतत्त्वातून नरांचे संजीवन होत असते, म्हणून आपतत्त्वाचे स्वामी शिवशंकरा, तू माझे त्या आपतत्त्वातून संजीवन व रक्षण कर, असा वरील श्लोकाचा शास्त्रीय अर्थ आहे.
 
म्हणजे निर्माणचित्ताची अवस्था आणल्यावर, श्रेष्ठ योग्याला त्याचे शरीर दृश्यमान करावयाचे असेल तर त्याने आपतत्त्वाची प्रक्रिया करून, भूमीतत्त्वाद्वारे ते सूक्ष्म शरीर पुन्हा दृश्यमान करण्याची प्रक्रिया केली पाहिजे. आपतत्त्व व भूमी तत्त्वातील या जटिल घडामोडी, श्रेष्ठ योग्याच्या केवळ इच्छामात्रेकरून होत असतात.
आजच्या वैज्ञानिक भाषेत हे समजावयाचे झाल्यास, आपतत्त्व म्हणजे ओतलोक वा ओतस्तर असून, पृथ्वी वा भूमितत्त्व म्हणजे अणुपरमाणुस्तर असतो. आजच्या विज्ञानानुसार ओत म्हणजे जडतत्त्व नसून, एक ओजसभार आहे. असे दोन, तीन वा आवश्यक तेवढे ओत जर विशिष्ठ कालानंतर विशिष्ट रचनेत भासमान झाले, तर ओतांच्या संख्येनुसार कोणतेही भिन्न मूलतत्त्व तयार होते. दोन ओत सापेक्षरित्या एकत्र आले की, त्यापासून उद्जन वायू तयार होतो. असे चार अथवा आठ ओत सापेक्षरित्या विशिष्ट अवस्थेत एकत्र आल्यास, क्रमशः नत्र वा प्राणवायू तयार होतो. अशा तर्‍हेने ओतांच्या भिन्न भिन्न सापेक्ष गतीमुळे, भिन्न पदार्थ वा वस्तू तयार होतात. वस्तू जड आहे तर ज्या ओतरचनेपासून त्या वस्तू तयार होतात, तो ओत मात्र पदार्थ नसून केवळ चैतन्याचा भार आहे. चैतन्यभारालाच वैदिक परंपरेत आपतत्त्व म्हणतात. आपतत्त्वातील वस्तूंचे दर्शन, ओतांचे प्रचंड गतिमान झंझावात असतात. त्यामुळे वस्तूंच्या पाण्यांतील कापर्‍या सावल्यांप्रमाणे, आपतत्वांतील वस्तू दिसतात. मृगजळ असेच दिसत असते.
जो महान योगी नवीन ठिकाणी आपला देह वा वस्तू उत्पन्न करू इच्छितो, त्याच्या केवळ इच्छाशक्तीमुळे प्रथम आपतत्त्वात ओतस्पंदने सुयोग्य भारसंख्येत उत्पन्न होतात. सुयोग्य इच्छाशक्तीचा हा प्रभाव आहे. आपतत्त्वातील इष्ट घडामोडींशिवाय त्याचा परिणाम म्हणजे, जे पृथ्वीतत्त्वीय दर्शन वा वस्तुलाभ घडू शकत नाही. पृथ्वीतत्त्व वस्तुलाभाकरिता, आपतत्त्वीय घडामोडी घडणे आवश्यक असते. आपतत्त्व सर्वत्र असल्यामुळे योग्याच्या इच्छामात्रेकरून, आपतत्त्वात योग्य स्पंदने उत्पन्न होतात. त्याद्वारे पृथ्वीतत्त्वीय वस्तुलाभही होतो. म्हणजेच योगी अनेक ठिकाणी आपलाच जडदेह वा अन्य वस्तू उत्पन्न करू शकतो. इच्छाशक्ती ऊर्जेचा एक स्वकृत भाग असल्यामुळे, योग्याचे केवळ इच्छाशक्तीने नवनिर्मिती होऊ शकते. जे प्रगत विज्ञानाचे विद्यार्थी असतील, त्यांना हा भाग लवकर समजू शकेल. सर्व विश्वाची ही घडामोड सुप्रसिद्ध वैज्ञानिक आईनस्टाईन यांनी, आपल्या सापेक्षवादाद्वारे (Theory of Relativity) जगाला समजावून दिली आहे. वरील सापेक्षतावादाची प्राचीन वैदिक जाणीव म्हणजे, आपतत्त्व आणि पृथ्वीतत्त्वीय घडामोडींचे तत्त्वज्ञान होय. वैदिक परंपरेत आपतत्त्वाचाही वर तेजस (light waves - unbottled waves) तत्त्व, तेजस तत्त्वावर वायुतत्त्व व वायुतत्त्वाच्याही वर आकाशतत्त्व सांगितले आहे. पातंजल योगसूत्रातील निर्माणचित्त व निर्माणकाया भाग समजाविण्याकरिता, एवढा प्रपंच करावा लागला.

(क्रमशः)
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
9702937357