महाकुंभ दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख
29-Jan-2025
Total Views |
लखनौ : प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात घडलेली दुर्घटना ही अत्यंत दुःखद आहे. मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी प्रचंड गर्दी झाली. यामध्ये घडलेल्या या दुर्घटनेत काही माणसांना आपला जीव गमवावा लागला तर काही जण जखमी झाले. या घडलेल्या प्रकारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi about Mahakumbh Accident ) यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून आपली हळहळ व्यक्त केली आहे.
महाकुंभ येथे २९ जानेवारी रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले. स्नानासाठी अनेक घाट बांधलेले असतानाही अमृत स्नानासाठी आलेल्या भाविकांनी संगमावरंच स्नान करण्याचा हट्ट केल्यामुळे हा प्रकार घडून आला. घडलेल्या दुर्घटनेनंतर संगमावर स्नान करण्यासाठी काही काळ बंदी घालण्यात आली. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त करत आपण त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले.
"प्रयागराज महाकुंभात घडलेली दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. यामध्ये ज्या भाविकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती माझी सहानुभूती आहे. यासोबतच, सर्व जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यात गुंतले आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्री योगीजींशी बोललो आहे आणि मी सतत राज्य सरकारच्या संपर्कात आहे, असे पंतप्रधान मोदींनी ट्विट करत सांगितले.
प्रयागराज महाकुंभ में हुआ हादसा अत्यंत दुखद है। इसमें जिन श्रद्धालुओं ने अपने परिजनों को खोया है, उनके प्रति मेरी गहरी संवेदनाएं। इसके साथ ही मैं सभी घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं। स्थानीय प्रशासन पीड़ितों की हरसंभव मदद में जुटा हुआ है। इस सिलसिले में मैंने…