महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अहिंदूंनी सोशल मीडियाद्वारे उडवली खिल्ली

29 Jan 2025 16:46:25
 
Mahakumbh Mela 2025
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील प्रयागरामध्ये सध्या महाकुंभमेळा (Mahakumbh Mela 2025) सुरु आहे. यासाठी देशातूनच नाहीतर जगभरातून भाविकांनी आपली उपस्थिती दाखवली आहे. मात्र या महाकुंभमेळ्यात २८ जानेवारी २०२५ रोजी मंगळवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारात दुर्दैवी घटना घडली आहे. महाकुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याने भाविक भक्तगण हे जखमी झाले आहेत. तर काहीजण मृत्यू पावल्याचे बोलले जात आहे. मात्र अशातच आता सोशल मीडियावर अहिंदू कट्टरपंथींनी घडलेल्या घटनेची खिल्ली उडवली आहे.
 
 
 
चेंगराचेंगरीसारखी विदारक परिस्थितीवर आता इस्लाम धर्मातील नेटकऱ्यांनी दुःखद घटनेचा आनंद साजरा केला असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. मौनी आमवस्येनिमित्त अमृत स्थानासाठी संगम घाटावर जाणाऱ्या अनेक हिंदू यात्रेकरूंना गर्दीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर या घटनेची माहिती प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियाद्वारे प्रसारित झाली. त्यावर आता काही अहिंदू कट्टरपंथींनी हाहा इमोजीचा वापर करत घडलेल्या घटनेवर आनंद व्यक्त केला आहे.
 
या प्रकरणाचे काही स्क्रीनशॉट आता समोर आले आहेत. हिंदू उत्सवादरम्यान दुर्रैवी घटनांवर फेसबुकवरील कट्टरपंथी अहिंदू वापरकर्त्यांनी दुःखद घटनेवर आनंद व्यक्त करणे ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी महाकुंभमेळ्यात आग लागली तेव्हा अनेक मुस्लिमांनी फेसबुकवर 'हाहा इमोजी'ने प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
 
 
 
Powered By Sangraha 9.0