धर्मावर एवढेच प्रेम असेल तर अयोध्येत बांधलेल्या राम मंदिरात जा अन्यथा...!

हनुमान चालीसा पठण सुरु असताना कट्टरपंथी युवकाचा उन्माद

    29-Jan-2025
Total Views |
 
Hanuman Chalisa
 
रायपूर : मोहम्मद इशाक खान नावाच्या कट्टरपंथीने छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील हनुमान चालीसाचे (Hanuman Chalisa) पठण करण्यात येणाऱ्या मंदिरातील एका अधिकाऱ्याला धमकावण्यात आले होते. धर्मावर एवढेच प्रेम असेल तर अयोध्येत जाऊन राम मंदिर बांधण्यात आले आहे तिथे जा. जर हनुमान चालीसाचे पठण थांबवले नाहीतर संबंधित परिसरात तोडफोड केली जाईल अशी धमकी त्याने दिली आहे. ही घटना २७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
 
कट्टरपंथी मोहम्मद म्हणाला की, तुम्हाला हिंदू बनण्याची एवढीच आवड असेल तर अयोध्येत जा. इथं थांबून हिंदू हिंदू करत बसू नका, असे अपशब्त त्याने वापरले आहेत. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोपी ऑटो रिक्षातून येत आहे. त्यावेळी तो मंदिर अधिकाऱ्यांना धमकी देताना दिसत आहे. असभ्य भाषेचा वापर करत त्यांनी हिंदू देवतांवर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केली आहे.
 
 
 
या घटनेवर आता स्थानिकांनी निषेध व्यक्त केला आहे. मोहम्मदवर गुन्हा दाखल करण्याची पोलिसांकडे मागणी करण्यात आली. त्याने हिंदू देवदेवतांबाबत अपमानास्पद टिप्पणी केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. एका हिंदू संघटनेतील व्यक्तीने या घडलेल्या घटनेवर भाष्य केले ते म्हणाले की, मंदिरातून येणाऱ्या आवाजामुळे त्याला त्रास होत असेल तर मशिदीतून दिवसातून पाच वेळा अजानवेळी भोंगे लावले जातात त्यामुळे अनेकांची अस्वस्थता होते. हे कोणी सांगायचे त्याला? आता हे सहन होण्यासारखे नसल्याची संतप्त भावना हिंदू व्यक्तीने व्यक्त केली.
 
या प्रकरणामध्ये आता एफआरआय दाखल करण्यात आला. त्यानंतर एका प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार आरोपीला अटक करण्यात आली आहे. कलम १७०,कलम १२६ आणि कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.