मिशनरी जोडप्यांनी आदिवासी हिंदूंचे केले ख्रिस्ती धर्मांतर

29 Jan 2025 19:14:42
 
धर्मांतर
 
लखनऊ : उत्तरप्रदेश पोलिसांनी रविवारी २६ जानेवारी २०२५ रोजी ओडिशामध्ये एका मिशनरी जोडप्याने हिंदूंना ख्रिस्ती धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला आणि अटक केली आहे. समरेंद्र सिंह आणि त्यांची पत्नी सुष्मिता सिंह असे संबंधित आरोपीचे नाव असून आता त्या आरोपीची ओळख पटली आहे.
 
दरम्यान या प्रकरणामध्ये एका स्थानिक वृत्तानुसार, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींविरोधात कारवाई केली आहे. सदस्यांच्या मते रविवारी २६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास छोटा लालपूर गावामध्ये धर्मांतर होत असल्याचे बोलले जात आहे.
 
यावेळी हा सर्व प्रकार अनुभवलेल्या सदस्यांनी सांगितले की, जोडपे हे केवळ १० दिवसांपूर्वी गावामध्ये आले होते आणि त्यांनी पैगंबर मुहल्लामधील अजय कुमार यांच्याकडून ६ हजार ५०० रुपयांना भाड्याने एक जागा घेतली होती. धर्मांतरासाठी गावामध्ये येण्याचे जोडप्याचे कारण होते, असे पोलिसांना कळवण्यात आले आहे.
 
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने संबंधित प्रकरणाच्या माहितीच्या आधारे, कोतवालीचे प्रबारी निरीक्षक सुनील कुमार सिंह हे पोलीस दलासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी तपासादरम्यान, आरोपी असलेले जोडपे हे ओडिशाचे रहिवाशी असल्याची माहिती समोर आली. यावेळी गोरगरीबांना आमिष दाखवत आदिवाशांचेही धर्मांतर केले जात होते.
 
Powered By Sangraha 9.0