हरियाणा सरकारने नदी पात्रात विष मिसळल्याचा पुरावा द्या!
निवडणूक आयोगाची केजरीवाल यांच्याकडे मागणी
29-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये (Delhi Assembly Election 2025) आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये गलगितुरा रंगला आहे. काही दिवसांआधी भाजपचे आपले आश्वासनपर पत्र जारी केले. त्यानंतर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही पत्रक जारी केले. त्या पत्रकामध्ये त्यांनी यमुना नदी साफ करण्याचे आश्वासन दिले. हे अश्वासन याआधी अनेकदा दिले होते. त्यावर अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा भाजप सरकारच पाण्यात विष मिसळत असल्याने नदीचे पात्र साफ होत नसल्याचा निरर्थक तर्क लावत दावा केला.
केजरीवाल यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवून पाण्यामध्ये विष मिसळ्याच्या वक्तव्यावरून उत्तर मागितले आहे. बुधवारी २९ जानेवारी २०२५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास उत्तरे द्यावी लागतील, अशी चिंता आता निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे. यामुळे प्रादेशिक गटांमधील शत्रुत्व, राज्यांतर्गत तणाव आणि पाणी टंचाईवरून कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, नोटीशीमध्ये विविध कायदेशीर तरतुदीचा उल्लेख करण्यात आला. राष्ट्रीय एकात्मकता आणि सार्वजनिक सौहार्दाच्या विरोधामध्ये दिशाभूल करणारी विधाने केल्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना तुरूंगवास होईल, असा इशारा देण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर आता नदीच्या पाण्यामध्ये आमोनियाचे प्रमाण वाढल्याच्या आरोपावरून निवडणूक आयोगाने हरियणा सरकारकडून २८ जानेवारीपर्यंत अहवाल मागवण्यात आला आहे.
हरियाणा भाजप सरकारने दिल्लीसाठी सोडल्या जाणाऱ्या पाण्यात विष मिसळ्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. दिल्ली जल बोर्डाने विष शोधून काढले नसते तर राजधानीत सामूहिक हत्याकांड झालेच नसते, असाही दावा करण्यात आला. मात्र, दिल्ली जल बोर्डाने केजरीवाल यांनी केलेले संबंधित आरोप फेटाळून लावले आहेत.