ठाण्यात सुशिक्षित बेरोजगारांकरिता रोजगार मेळावा

    29-Jan-2025
Total Views |
Employment Fair

ठाणे
: ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि सिध्दार्थ ओवळेकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता न्यु हॉरिझन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अॅन्ड मॅनेजमेंट, आनंद नगर, ठाणे (प.) येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता रोजगार मेळावा ( Employment Fair in Thane ) आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात एस.एस.सी, एच.एस.सी, पदवीधर, आय.टी.आय 'डिप्लोमा इत्यादी शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तरी सर्व नोकरी इच्छूक उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त संध्या साळुंखे यांनी केले आहे.