पुण्यामध्ये होणार डॉक्टरांचे साहित्य संमेलन

    29-Jan-2025
Total Views |

image
 
पुणे : फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रम होत आहेत. याच कार्यक्रमांचा एक भाग म्हणून ‘सरहद भवन, सेमिनार हॉल, कात्रज, पुणे ४६’ येथे गुरूवार ३० जानेवारी रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत डॉक्टरांचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. राजन संचेती (अध्यक्ष आय. एम. ए.) या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राजेंद्र जगताप, डॉ. अमोल देवळेकर आणि डॉ. सतिश देसाई या कार्यक्रमाचे संयोजक आहेत. या कार्यक्रमाला अधिकाधिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.