राष्ट्रपती, पंतप्रधान आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
29-Jan-2025
Total Views |
लखनऊ : मौनी अमावस्येला प्रयागराजच्या महाकुंभामध्ये (Mahakumbh 2025) वाढलेल्या गर्दीमुळे भाविक भक्तगणांमध्ये चेंगराचेंगरी झाली. बुधवारी २९ जानेवारी रोजी पाहटे १ वाजण्याच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अनेक भाविक हे जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. या घडलेल्या घटनेमध्ये आमचे लक्ष असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
द्रौपदी मुर्मू यांचे ट्विट
प्रयागराज महाकुंभात झालेली दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. जखमी झालेल्या भाविकांच्या कुटुंबीयांच्या संवेदना मी व्यक्त करते आणि सर्व जखमी भाविक लवकर बरे व्हावेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते, असे ट्विट द्रौपदी मुर्मू यांनी केले होते.
प्रयागराज महाकुंभ में भगदड़ की घटना अत्यंत दुखद है। मैं हताहत हुए श्रद्धालुओं के परिवारजनों के प्रति शोक-संवेदना व्यक्त करती हूं और ईश्वर से प्रार्थना करती हूं कि घायल हुए सभी श्रद्धालु शीघ्र ही स्वस्थ हों।
प्रयागराज महाकुंभात झालेली दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यात भक्तांनी आपले कुटुंबीय गमावले आहे. त्यांच्याप्रती माझ्या मनापासून संवेदना आहेत. यासोबतच सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी कामना करतो. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यात गुंतले आहेत. या संदर्भात मी मुख्यमंत्री योगीजी यांच्याशी बोललो आहे आणि मी राज्य सरकारच्या सतत संपर्कात असेन, असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
प्रयागराज महाकुंभ में हुआ हादसा अत्यंत दुखद है। इसमें जिन श्रद्धालुओं ने अपने परिजनों को खोया है, उनके प्रति मेरी गहरी संवेदनाएं। इसके साथ ही मैं सभी घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं। स्थानीय प्रशासन पीड़ितों की हरसंभव मदद में जुटा हुआ है। इस सिलसिले में मैंने…
तमाम संत, भक्त, राज्यातील आणि देशातील जनतेला आवाहन करतो की, अफवांवर लक्ष देऊ नका, संयमाने वागा, प्रशासन तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी तत्परतेने काम करत आहे... असे ट्विट त्यांनी केले आहे.
सभी पूज्य संतों, श्रद्धालुओं, प्रदेश एवं देश वासियों से मेरी अपील है कि अफवाह पर कोई ध्यान न दें, संयम से काम लें, प्रशासन आप सभी की सेवा के लिए तत्परता से कार्य कर रहा है... pic.twitter.com/r3qAkveJoz
प्रसारमाध्यमानुसार, संगम नाक्यावर झालेल्या चेंगराचेगरीत एका अफवेमुळे भाविकांची धांदल उडाली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि काही महिला जमिनीवर आदळल्या गेल्या. त्यांना चिरत काही लोक पुढे सरसावले आणि यामध्ये अनेकजण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी घटनास्थळी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी परिस्थितीची माहिती मिळवली.