मुंबई : व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रेसर कंपनी असा लौकिक असलेल्या अॅप्टेक लिमिटेड या कंपनी कडून सर्जनशील व्यावसायिकांसाठी एक एआय आधारित टूल विकसित करण्यात आले आहे. क्रेव्हल असे या टूलचे नाव असून हे सर्जनशील व्यावसायिकांना त्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी, त्यासाठी रचनात्मक अभिप्राय, श्रेणी आणि कृतीशील माहिती मिळवण्यासाठी सक्षम करते. एडब्ल्यूएस इंडिया प्रा. लि. या कंपनीकडून या टूल साठी अॅमेझॉन बेडरॉकचा वापर करण्यात आला आहे. हे टूल सर्वच वयोगटातील लोकांसाठी खुले असून यामध्ये पुढे जाऊन व्हिडिओचासुध्दा समावेश केला जाणार आहे असे अॅप्टेक कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
या टूलमध्ये कस्टमायझेशन, सुरक्षितता, गोपनीयता आणि सेफ्टी गार्डरेल्स या क्षमतांचा वापर करत व्यावसायिकांनी केलेल्या कलाकृतींचे संरक्षण केले जाणार आहे. हे जगातील सर्वच व्यावसायिकांना उपलब्ध होणार आहे. या टूलमध्ये कलाकृतीबद्दल सर्वसमावेशक अभिप्राय, सविस्तर विश्लेषण,कृतीशील माहीती आणि केलेल्या प्रत्येक कलाकृतीला गुण पण दिले जाणार आहेत. यामुळे ते टूल वापरणाऱ्या व्यावसायिकाला आपल्या कलाकृतीतीचे मुल्यांकन करुन त्यात सुधारणा करण्यासाठी मदत होऊ शकते. या क्रेव्हल टूलमधून अॅनीमेशन, ३ डी, ग्राफिक्स, फोटोग्राफी अशा विविध व्हिज्युअल आर्ट्सचे मुल्यांकन करणे शक्य होणार आहे.
या टूलबद्दल अॅप्टेक लिमिटेडचे ग्लोबल रिअल बिझनेसचे चीफ बिझनेस ऑफिसर संदीप वेलिंग यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की हे क्रेव्हल टूल शिक्षण व प्रशिक्षण या क्षेत्रामध्ये क्रांतीकारी बदल घडवून आणणार आहे. क्रेव्हल हा फक्त एक मूल्यांकन प्लॅटफॉर्म नसून प्रत्येक महत्वाकांक्षी कलाकार आणि सर्जनशील व्यावसायिकांना भविष्यातील संधींचा फायदा करुण घेण्यासाठी मदत करणार आहे. आम्हांला विश्वास आहे की हे टूल विद्यार्थी आणि सर्जनशील व्यावसायिकांना त्यांच्या कलागुणांत निपुण होण्यास मदत करेल, त्यांना प्रगती साधणे नक्कीच शक्य होईल.
जनरेटिव्ह एआय हे एक शक्तीशाली तंत्रज्ञान आहे. याच्या वापरातून आपल्याला आपली नाविन्यता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी मदत होते असे मत या क्रेवल या टूलला लागणारे सर्व तंत्रज्ञान पुरवणारी कंपनी एडब्ल्यूएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे कनिष्क अगिवाल यांनी व्यक्त केले. यामध्ये व्यावसायिकाला तसेच कुठल्याही कलाकाराला त्याची माहीती सुरक्षित राहण्याची हमी देण्यात आली आहे. आपली वैयक्तिक माहीती, आपण तयार केलेले कुठलेही डिझाइन याबद्दल गोपनीयता बाळगली जाते. त्यामुळे या माध्यमाचा वापर करणे सर्वांनाच सोपे होणार आहे.