महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत ९० जण रुग्णालयात दाखल

मृतांचा आकडा आला समोर

    29-Jan-2025
Total Views |

 Mahakumbh 2025
 
लखनऊ : प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळाव्यात  (Mahakumbh 2025) मंगळवारी २८ जानेवारी २०२५ रोजी संगम घाटावर भाविकांची अमृत स्नानासाठी प्रचंड गर्दी वाढली होती. त्यावेळी गर्दीमुळे नागा साधू आल्याची अफवा पसरल्याने असंख्य भाविकांनी पळापळ झाली. घटनेदरम्यान अनेकजण गर्दीमध्ये चिरडले गेले. या घटनेला आता काही तास उलटून गेले आहेत. या अपघातात ९० जण भाविक जखमी झाले असून ३० जण भाविक मृत पावल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचे ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
मृत ३० पैकी यातून आता २५ जणांची ओळख पटली असल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर ९० जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेत अधिकाऱ्यांच्या मते, गर्दीमुळे बॅरिके़ड्स तोडत चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.
उत्तर प्रदेशातील प्रयागरामध्ये २०२५ मध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान संगम घाटानजीक अमृत स्नानासाठी भाविक जमल्याने गर्दी वाढली होती. ही परिस्थिती निर्माण झाल्याने एकप्रकारे महाकुंभमेळा २०२५ ला गालबोट लागले असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही.
 
 
 
प्रसारमाध्यमानुसार, रात्री १.३० वाजताच्या सुमारास मोठ्या संख्येने भाविकांनी संगम घाटाच्या दिशेने जात असताना अचानक चेंगराचेंगरी झाली. अशावेळी काही लोक हे गर्दीत सापडल्याने तिथेच घटनास्थळी पडले होते. यामध्ये काहींचा मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर एका रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.