मुलींच्या वसतीगृहात ख्रिस्ती धर्मांतराचा प्रयत्न

विद्यार्थींनींना बायबल वाचण्यास पाडले भाग

    28-Jan-2025
Total Views |

conversion
 
भोपाळ : मध्य प्रदेशातील आदिवासी विद्यार्थींनींसाठी बांधण्यात आलेल्या खरगोन जिल्ह्यातील चिरवामधील वसतिगृहामध्ये ख्रिश्चन धर्मांतराचा (conversion) प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी २७ जानेवारी रोजी घडली आहे. यावेळी विद्यार्थींनींना बायबल वाचण्यास आणि रात्रीच्या वेळी ख्रिश्चन प्रार्थना करण्यास भाग पाडले आहे. दरम्यान पीडितांचा मानसिक छळही करण्यात आला होता. या प्रकरणात तपासादरम्यान, गटशिक्षण अधिकारी यांनी रिता खर्ते यांना निलंबित करण्यााचा निर्णय घेतला आहे.
 
यावेळी पीडित मुलींनी रिता खर्तेंनी केलेल्या कृत्यांचा पाढाच वाचून दाखवला होता. रिता या त्यांना भांडी धुणे, धान्य साफ करणे अशी इतर कामे करण्यास सांगत होती. तसेच बायबल वाचण्यासही दबाव आणत होती. यामुळे संबंधित मुलींचा मानसिक छळ झाल्याचे बोलले जात आहे.
 
संबंधित प्रकरणाचे गांभीर्य पाहून दिनेशचंद्र पटेल यांनी वसतिगृहाला भेट दिली आहे. मुलीची चौकशी करत असताना त्यांच्याकडून धार्मिक पुस्तके आणि वह्या जप्त करण्यात आल्या. पीडितांच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडे संबंधित प्रकरणावर चौकशी करण्याविषयी मागणी केली आहे.
 
तपासानंतर अधीक्षक रिता खर्ते यांना पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी संगीता यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.