लखनौ : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजला महाकुंभ मेळा ( Maha Kumbh Mela ) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. उत्तर प्रदेशातील मेरठचे खासदार अरुण गोविल यांनी महाकुंभ मेळ्यात पत्नीसोबत हजेरी लावत त्रिवेणी संगमात डुबकी घेतली. त्यांनी भगवे कपडे परिधान केले होते. तसेच पंडित धीरेंद्र शास्त्री यांचीही भेट घेतली. मां गंगा, मां यमुना आणि मां सरस्वती सर्वांचे कल्याण करो, असे म्हणत अरुण यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
टीव्हीवरील 'रामायण' मालिकेत भगवान राम यांची भूमिका साकारणारे अरुण गोविल घराघरात लोकप्रिय आहेत. त्यांनी नुकतीच प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्यात आपली हजेरी लावली. त्यांनी आपल्या पत्नीसोबत पवित्र अशा त्रिवेणी संगमात डुबकी घेतली. मां गंगा, मां यमुना आणि मां सरस्वती सर्वांचे कल्याण करो, असे म्हणत त्यांनी सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले.
यामुळे रामायण मालिकेतील राम हे स्वतः अयोध्या नगरीत अवतरल्याच्या चर्चादेखील होताना दिसून आल्या. अशाप्रकारे अनेक दिग्गज लोक प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभला आपली उपस्थिती दर्शवत आहेत.