६० व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारासाठी नामांकने जाहीर
‘धर्मवीर’, ‘हर हर महादेव’ला नामांकन
28-Jan-2025
Total Views |
मुंबई : (60th State Marathi Film Awards) ६०व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीकरिता अनन्या, पाँडिचेरी, सनी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, ४ ब्लाईंड मेन, समायरा, गाभ, ह्या गोष्टीला नावच नाही, ग्लोबल आडगाव, हर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. २८ जानेवारी रोजी याबाबत माहिती दिली.
मंत्रालयातील दालनात मंत्री शेलार यांनी ६० व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर केले. उत्कृष्ट बालकलाकार म्हणून श्रीनिवास पोकळे (छुमंतर) व अर्णव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट कला दिग्दर्शन - महेश कुंडलकर(उनाड), उत्कृष्ट छाया लेखन - अभिजीत चौधरी(फोर ब्लाइंड मेन) ओंकार बर्वे (ह्या गोष्टीला नावच नाही) उत्कृष्ट संकलन - यश सुर्वे (काटा किर्र), उत्कृष्ट ध्वनिमुद्रन - सुहास राणे (ह्या गोष्टीला नावच नाही), उत्कृष्ट ध्वनी संयोजन - लोचन प्रताप कानविंदे (हर हर महादेव), उत्कृष्ट वेशभूषा - उज्वला सिंग (ताठ कणा), उत्कृष्ट रंगभूषा - सुमित जाधव (ताठ कणा), यांना तांत्रिक विभातील पुरस्कार जाहीर झाले आहेत.
पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी दि. १ जानेवारी ते दि. ३१ डिसेंबर २०२२ या वर्षात सेन्सॉर झालेल्या एकूण ५० प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या चित्रपटांचे परीक्षण मुग्धा गोडबोले, विवेक लागू, बाबासाहेब सौदागर, विजय भोपे, श्रीरंग आरस, राजा फडतरे, शरद सावंत, मेधा घाडगे, चैत्राली डोंगरे, विनोद गणात्रा, प्रकाश जाधव, शर्वरी पिल्लेई, जफर सुलतान, देवदत्त राऊत, विद्यासागर अध्यापक यांनी केले होते.