या आठवड्यात ओटीटीवर धमाल मनोरंजन; नवीन चित्रपट आणि वेबसीरिजची मेजवानी!

    28-Jan-2025
Total Views |



ott
मुंबई : या आठवड्यात, २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान, प्रेक्षकांना विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर मनोरंजनाचा महापूर अनुभवता येईल. दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेबसिरीज प्रेक्षकांसाठी सादर केल्या जातात. घरबसल्या प्रेक्षकांना दमदार आणि ताज्या कंटेंटचा आनंद घेण्याची ही अनोखी संधी आहे.
चित्रपट असो किंवा वेबसिरीज, या आठवड्यात सर्व वयोगटांसाठी काहीतरी खास पाहायला मिळणार आहे. आपल्या पसंतीच्या OTT प्लॅटफॉर्मवर कोणते धमाल चित्रपट आणि वेबसिरीज येणार आहेत, ते पहा,

रिक्रूट सीझन २ :
'रिक्रूट सीझन २' ही एक इंग्लिश स्पाय थ्रिलर वेब सीरिज आहे, जी ३० जानेवारी रोजी नेटफ्लिक्स वर रिलीज होणार आहे. 'रिक्रूट सीझन २' च्या ट्रेलर ने आगामी सीझनसाठी प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे.
आयडेंटिटी :
ओळख आणि गुप्ततेवर आधारित थरारक आयडेंटिटी हा चित्रपट ३१ जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म 'झी ५' वर प्रदर्शित होणार आहे.
द स्टोरी टेलर :
अभिनेता परेश रावल यांचा चित्रपट 'द स्टोरी टेलर' ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार २८ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
पुष्पा २:
लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन याचा चित्रपट पुष्पा २ ने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केल्यानंतर ओटीटी मध्ये पदार्पण करणार आहे. याची तारीख अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही.
द सीक्रेट ऑफ शिलेदार :
राजीव खंडेलवाल यांच्या बहुप्रतिक्षित वेब सीरिज 'द सीक्रेट ऑफ शिलेदार' च्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. ही सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टारवर ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.