टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने रचला इतिहास, ICC 'क्रिकेट ऑफ द इयर' पुरस्कारावर कोरले नाव

    28-Jan-2025
Total Views |
 
Jasprit Bumrah
 
नवी दिल्ली : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah)  आयसीसी क्रिकेट पुरुष गटामध्ये क्रिकेट ऑफ द इयरचा प्रतिष्ठित सर गारफिल्ड पुरस्कार मिळाला आहे. २०२४ मध्ये त्याने कसोटी आणि टी २० या दोन्ही स्वरूपात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याप्रकरणी नावाजण्यात आले आहे. त्याने ट्रॅव्हिस हेड, जो रूट आणि हॅरी ब्रूक यांना मागे टाकत हा किताब जिंकला.
 
हाच पुरस्कार २००४ साली माजी क्रिकेटपटू आण टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविडला मिळाला होता. त्यानंतर २०१० साली क्रिकेटचा देव अर्थातच माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरलाही देण्यात आला होता. त्यानंतर २०१६ मध्ये फिरकीपटू गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि विराट कोहलीला सलग दोन वेळा म्हणजे २०१७-१८ वर्षात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 
 
 
 
२०२४ च्या आयसीसी पुरुष टी २० विश्वचषकात जसप्रीत बुमराहने उत्कृष्ट कामगिरी केली होती. अंतिम सामन्यात टीम इंडियाने सामन्यावर पकड मिळवत विजय मिळवला होता. ४.१७ च्या गुणवत्तेतून त्याने १५ बळी घेत त्याला मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.
 
बुमराहने एक दिवसीय क्रिकेट खेळामध्ये चमक दाखवली आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज बुमराहने फक्त १३ कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये ७१ बळी घेतले. जे कोणालाही जमले नाही. माजी क्रिकेटपटू कपिल देवनंतर जसप्रीत बुमराह सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू ठरला आहे. २०२४ च्या अंतिम वर्षी त्याने सर्वाधिक गडी बाद करत आपल्या नावे नवीन विक्रमाची नोंद केली आहे.