नवी दिल्ली: प्रयागराजमधील सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात (Mahakumbh) दि : २८ जानेवारी २०२ रोजी मौनी अमावस्येच्या पर्वणीमध्ये १० कोटींहून अधिक हिंदू अमृतस्नान करणार आहेत.
महाकुंभात आज मौनी अमावस्येला दुसरे अमृतस्नान होणार असून त्यासाठी १० कोटी भाविक एकत्र येण्याची अपेक्षा आहे. या दिवशी स्नान आणि दानधर्माचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन योगी आदित्यनाथ सरकारने मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. ज्यामध्ये सुरक्षा व्यवस्थेपासून ते वाहतुकीच्या साधनांपर्यंत आणि सर्व प्रकारच्या सुविधांचा समावेश आहे. मौनी अमावस्येच्या निमित्ताने प्रयागराज येथे भाविकांचा ओघ येणार असून या दिवशी लोकसंख्येच्या बाबतीत प्रयागराज दिल्ली आणि आंध्र प्रदेशसह या राज्यांसह अनेक देशांचा विक्रम मोडू शकते. मौनी अमावस्येला, २९ जानेवारी रोजी, ब्रह्म मुहूर्त सकाळी ५:२५ वाजता सुरू होईल आणि सकाळी ६:१९ पर्यंत राहील.
अमृतस्नानासाठी येणाऱ्या सुमारे १० कोटी भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने विस्तृत तयारी केली आहे. कुंभमेळ्याला गाड्यांद्वारे येणाऱ्या आणि तेथून परतणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने जय्यत तयारी केली आहेयाअंतर्गत, काही गाड्या प्रयागराजच्या इतर आणि जवळच्या स्थानकांवर थांबविल्या जातील. जेणेकरून एकाच स्थानकावर प्रवाशांची गर्दी होणार नाही. यासाठी रेल्वेने आरपीएफच्या सहकार्याने एक मोठी योजना तयार केली आहे. रिकाम्या गाड्या प्रयागराजला आणणे आणि येथून शक्य तितक्या प्रवाशांना बाहेर काढणे याला प्राधान्य दिले जाईल. दर चार मिनिटांनी एक रेल्वे अशी विक्रमी वाहतूक होणार आहे.