‘इतिहास कट्टा’ मध्ये उलगडणार ‘वेदकालीन स्त्रीजीवन’

    28-Jan-2025
Total Views |

image
मुंबई : दर महिन्यात भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या ‘इतिहास कट्टा गोष्ट – ‘ती’ ची’ या कार्यक्रमाचे फेब्रुवारी महिन्याच्या चौथ्या रविवारी म्हणजेच २३ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. २३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५:३० ते ७:३० या वेळेत ‘वनविहार बोरीवली पश्चिम’ येथे हा कार्यक्रम होणार आहे. ‘वेदकालीन स्त्रीजीवन’ असा या कार्यक्रमाचा विषय असणार आहे. डॉ. आसावरी बापट या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. अधिकाधिक इतिहासप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.