अवैध बांधकामावर स्थानिकांचा हातोडा

समाधी ३०-४० वर्षे जूनी असल्याचा दावा

    28-Jan-2025
Total Views |
 
 
 illegal construction
 
 
लखनऊ : उत्तरप्रदेशातील बरेलीमध्ये एका गावात अवैध ठिकाणी बांधकाम करण्यात आले आहे. बरेली खासदाराने या प्रकरणाची तक्रार केल्यावर प्रशासनाने चौकशी करत नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आता बरेलीच्या खासदारांनी लक्ष घालत अवैध बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे.
 
प्रसारमाध्यमाच्या रिपोर्टनुसार, ही घटना बरेलीच्या शाही पोलीस ठाणे हद्दीत गणेशपूरमधील गावात घडली आहे. या गावातील एक जुने थडगे असल्याचे सांगण्यात येत आहे. ही समाधी सुमारे ३०-४० वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे. कट्टरपंथींनी रातोरात त्याच्या भोवती २० फूट उंच खांब उभारले होते.
 
या बांधकामासाठी ना प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती ना कोणतीही माहिती देण्यात आली होती. बरेलीचे खासदार छत्रपाल सिंग गंगावर हे गावानजीकहून जातेवेळी संबंधित प्रकरणाचा खुलासा झाला. त्यांनी घटनास्थळी दाखल होत संबंधित प्रकरणाची माहिती मिळवली आहे.
 
या प्रकरणासंबंधित एसडीएमने चौकशीचे आदेश जारी केले. प्रशासनाने तपासणी केली असता हे संबंधित बांधकाम पाडण्यासाठी प्रशासन कोणतीही कारवाई करण्यापूर्वी लोकांनी अवैध बांधकामावर हातोडा चालवला आहे. जून्या मंदिराच्या संरक्षणासाठी त्यांनी हे नवे बांधकाम केल्याचे मुस्लिमांनी सांगितले आहे. मात्र, प्रशासनाकडून चौकशी करत याबाबत कोणतेही कागदपत्र दाखवण्यात आलेले नाही.
 
या प्रकरणाची कारवाई करत पोलिसांनी गावातील १०० लोकांविरोधात शांतता भंग केल्याप्रकरणी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यांची ५ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. अवैध बांधकाम पाडण्यावर कोणताही एक वाद झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.