संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक-साहित्यिक डॉ. अशोक कामत यांचे निधन

28 Jan 2025 14:45:59

Ashok Kamat
 
पुणे : संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, साहित्यिक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाचे माजी प्रमुख डॉ. अशोक कामत यांचे रविवारी वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
 
पुणे विद्यापीठातील संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख म्हणून अनेक वर्षे कार्य करून ते निवृत्त झाले होते. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये एम.ए., पीएच.डी. करून त्यांनी विपुल ग्रंथलेखन केले आहे. ‘महाराष्ट्र के नाथपंथिय कवियोंका हिंदी काव्य’ या विषयावर त्यांनी हिंदीत प्रबंध लिहून पीएच.डी. संपादन केली होती. मथुरा येथील जवाहर पुस्तकालयाने हा प्रबंध ग्रंथरूपाने प्रकाशित केला आहे. डॉ. कामत यांनी ‘नामदेवांचे जीवन आणि त्यांचे हिंदी मराठी काव्य यांचा पुनर्विचार’ या विषयावर मराठीत प्रबंध लिहून १९८४ मध्ये दुसरी पीएच.डी. पदवी संपादन केली होती.
Powered By Sangraha 9.0