उबाठाने स्वतःच्याच हाताने आपल्या चेहऱ्यावरचा 'हिजाब' फाडला! मंत्री आशिष शेलार यांचा घणाघात

    28-Jan-2025
Total Views |
 
Ashish Shelar
 
मुंबई : उबाठा गटाने वक्फ कायदा सुधारणेला विरोध करुन स्वतःच्या हातानेच आपल्या चेहऱ्यावरचा 'हिजाब' टराटरा फाडला, असा घणाघात मंत्री आशिष शेलार यांनी केला आहे. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
 
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "वक्फ कायदा सुधारणेला विरोध करुन उबाठाने आपल्या चेहऱ्यावरचा हिजाब स्वतःच्या हातानेच टराटरा फाडला आणि उबाठा गटाचा असली चेहरा जगासमोर आणला. उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत आणि असदुद्दीन ओवेसी यांनी एकत्रित मतदान केले. देशाच्या राजकीय इतिहासात ही काळ्या शाईने लिहावी अशी घटना आहे. यालाच हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसणे असे म्हणतात. तुमचा कार्यक्रम जोरात चालू ठेवा. हिंदुला अडवा आणि औरंगजेब फॅन क्लब वाढवा," अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
 
हे वाचलंत का? -  उबाठा गटाला दणका! माजी नगरसेविका राजूल पटेल यांचा पक्षाला रामराम
 
सोमवार, २८ जानेवारी रोजी संसदेत वक्फ सुधारणा विधेयक नवीन स्वरूपात मांडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याविषयी स्थापन संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) सदस्यांच्या सुधारणा बहुमतामने स्वीकारण्याता आल्या असून विरोधी पक्षांच्या सुधारणा बहुमत नसल्याने फेटाळण्यात आल्या आहेत. दरम्यान, जेपीसीच्या निर्णयास विरोधी पक्षांच्या खासदारांनी विरोध केला होता.